आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष  -सूत्र

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांना बंडखोरीचे बक्षीस? पवारांनी माफ केल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री पद
  • काँग्रेस, भाजपसह शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भूषविणारे एकमेव नेते

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार आहेत. वृत्तसंस्था एएनआयने सुत्रांचा दाखला देत ही माहिती जाहीर केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. परंतु, अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाहीत. त्यांना नंतर हे पद दिले जाणार असे सांगितले जात आहे. असे झाल्यास अजित पवार हे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवतील. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आणि त्यानंतर नुकतेच भाजपला समर्थन देऊन ते 4 दिवसांचे उपमुख्यमंत्री बनले होते.


भाजपची साथ देऊन सर्वांचे टीकेचे लक्ष्य बनलेले अजित पवार अखेर स्वगृही परतले. तसेच आपण राष्ट्रवादीतच आहोत अशी स्पष्टोक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले होते, की अजित पवार राष्ट्रवादीतच आहेत. त्यांची पक्षातील भूमिका बदलणार नाही. सोबतच, शरद पवारांनी त्यांना माफ केले असे त्यांनी सांगितले होते. यानंतर माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, मला मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे अजित पवार म्हणाले होते.

शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यात एकत्र निवडणूक लढवलेल्या शिवसेना आणि भाजपला बहुमत मिळाले. परंतु, मुख्यमंत्री पदावर एकमत होऊ न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आमदारांचे समर्थन घेऊन भाजपची सत्ता स्थापित केली. तसेच स्वतः मुख्यमंत्री आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले. पण, हे सरकार 4 दिवस सुद्धा टिकू शकले नाही. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापित करत आहे.