आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता स्थापनेनंतर अजित पवारांचे पहिले ट्विट, पीएम मोदींसह भाजप नेत्यांचे मानले आभार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उप-मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पीएम मोदी यांनी शनिवारी एक ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले होते. त्यालाच उत्तर देताना अजित पवारांनी हे ट्विट केले. यासोबतच उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, पीयूष गोयल, स्मृती इराणी यांनाही रिट्वीट केले आहे. सोबतच, अजित पवार यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये स्वतःचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.