आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणी कार्यकर्ता तयार होत नसल्याचे पाहून संतापलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चक्क 'पुळचट' ठरवून टाकले. 'खासदार व्हा म्हटले तर आमदारच व्हायचे असे म्हणतात. हे काय कामाचे?" या शब्दांत पवार रविवारी कार्यकर्त्यांवर डाफरले.
शरद पवारांचा बालेकिल्ला असूनही शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी 'राष्ट्रवादी'वर मात करत तीनदा निवडणूक जिंकली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव यांच्या विरोधात 'राष्ट्रवादी'चे दिलीप वळसे-पाटील यांनी मैदानात उतरावे, असा अजित पवारांचा प्रयत्न होता. मात्र वळसे यांनी नकार दिला. त्यानंतर येथून निवडणूक लढवण्यासाठी कोणीही तयार होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अजित पवारांनी संतापाला वाट करून दिली. कोणाचेही नाव न घेता पवारांनी वळसेंवरच निशाणा साधल्याची चर्चा आहे.
मीही लढण्यास तयार
पवार साहेबांनी सांगितले तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. शिरूरमधून उमेदवारी अर्ज भरला तर मीच निवडून येईन. निवडून आलो नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.