आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयात पाऊल टाकताच अजित पवारांची क्लीन चिट मिळणे हा विलक्षण याेगायाेग आहे- एकनाथ खडसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : 'अजित पवारांचे अचानक भाजपसाेबत येऊन उपमुख्यमंत्री हाेणे, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री हाेऊन साेमवारी त्यांच्या कार्यालयात पहिले पाऊल ठेवणे आणि त्याच क्षणी अजित पवारांच्या चाैकशीच्या फाइल बंद हाेऊन त्यांना क्लीन चिट मिळणे हे जनतेच्या दृष्टीेने हेतुपुरस्सर आहे का? अशी शंका येण्यासारखे असले तरी तसे काहीही नाही. हा विलक्षण याेगायाेग आहे, त्याकडे संशयाने न पाहता डाेळसपणे पाहिले पाहिजे,' असे खाेचक मत भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी साेमवारी व्यक्त केले. खडसे म्हणाले, 'अजित पवारांच्या बाबतीत शंका येणे स्वाभाविक आहे. परंतु, हे सारेच याेगायाेगाने घडले. राजकारणाची पातळी घसरली आहे. मतदारांत सर्वच पक्षांच्या राजकारण्यांविषयी प्रचंड चीड आहे. मतदार तर राजकारण्यांकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत. मी बिहार, उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी असे राजकारण पाहिले आहे. पण सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याबाबत न बाेललेलेच बरे. केवळ आराेप हाेते म्हणून मी नैतिकता पाळून राजीनामा दिला हाेता. आराेप हाेते म्हणून खडसे चालले नाहीत. आताचे काय हे मी सांगण्याची गरज वाटत नाही. राजकारणातील नैतिक मूल्ये हरवली आहेत याची मला खंत आहे.'

बातम्या आणखी आहेत...