आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांसाेबत माजी सैनिकाची शाब्दिक चकमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती -  गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुपांतर चौपदरी राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. यासाठी लोकांनी जमीनी न विकता उद्योग व्यवसाय उभारावेत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २२ वर्षांपूर्वी सांगितले होते. मात्र, पवार यांनी  पेट्रोलपंपच्या उभारणीत शिफारस न केल्याने  एका माजी सैनिकांने पवारांवर प्रश्नाच्या शाब्दिक फैरी झाडल्या. त्यामुळे वैतागलेल्या ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगत  अजित पवारांनी बैठकीतून काढता पाय घेतला.  


निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने पशू संवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे मनसुबे रचले आहेत.  काही दिवसांपूर्वी देखील महादेव जानकर यांनीही बारामती मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने  राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,  पवार येथून निघून गेल्यानंतर या प्रकरणाची गावकऱ्यांत चर्चा  होती.

 

जानकरांचाही दौरा
जानकरांनीही बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. त्यापाठोपाठ अजित पवार यांनी त्याच गावांचा दौरा पूर्ण केला. पवारांच्या दौऱ्यादरम्यान उंडवडी सुपे येथे एका गावभेटीच्या कार्यक्रमात ज्ञानदेव गवळी या वयोवृध्द माजी सैनिकाने २२ वर्षापूर्वी  आपल्याला गावालगत पेट्रोलपंप मंजूर झाला. केवळ वजनदार नेत्याच्या शिफारसी अभावी आपल्याला यांना पेट्रोलपंप मिळाला नाही, अशी भर बैठकीत गवळी यांनी आठवण पवारांना करून दिली.  त्यावर  पेट्रोलपंप मंजूरीची जबाबदारी आपल्यावर नसून ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे सांगून पवारांनी बैठक आटोपती घेत काढता पाय घेतला.

बातम्या आणखी आहेत...