आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा फोन जेव्हा हॅक होतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकांत काळ्या पैशाचा व्यवहार हाेताे. उमेदवारी मिळवण्यासाठीचे बहुतेक व्यवहार हवालाने होतात. त्यात ओघानेच अनेकांची फसवणूक होते. असाच किस्सा चक्क माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत उघडकीस आला आहे.  

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी विश्वस्त नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी पक्षाचे माजी विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या क्रमांकावरून फोन आला. फोनवर कुणाल नामक व्यक्ती होती. सध्या दादा पुण्यात आहेत. मात्र, एका व्यक्तीला मुंबईत तातडीने मोठी रक्कम अदा करायची आहे. तुम्ही या या बँक खात्यावर इतकी इतकी रक्कम तत्काळ भरण्याची व्यवस्था करा. राणे यांनी लगेच होकार कळवला आणि पैशाची व्यवस्था करण्यासाठी १० मिनिटे वेळ मागितला. राणे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. असा फोन अजित पवार यांचा कधीच येऊ शकत नाही, असा त्यांचा अंदाज होता. त्यांनी अजित पवार यांचे स्वीय सहायक मुसळे यांना फोन लावला. तेव्हा अजित पवार पुण्यात असल्याचे कळले. राणे यांनी अर्ध्या तासाने अजित पवार यांना फोन लावला, काही वेळातच पैशाची व्यवस्था करतो, असे सांगितले. मात्र, अजित पवार यांनी मी तुम्हाला फोन केलेलाच नाही. माझा फोन माझ्याकडे आहे. कोणत्या पैशाचे बोलता? असा प्रतिप्रश्न केला.  त्यानंतर सर्व उलगडा झाला. अजित पवार यांचा फोन हॅक झाल्याचे समजले. त्यानंतर राणे यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमकडे यासंदर्भात तक्रार दिली असून फोनचे सर्व काॅल डिटेल्स दिले  असल्याचे सांगण्यात आले.