आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांच्या पाठीत खंजीर, हीच वसंतदादांना चिरशांती; शालिनीताई पाटील यांची खाेचक प्रतिक्रिया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश जोशी 

सांगली - ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी सत्ता स्थापन केली होती. आता पुतणे अजित पवार यांनीच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखले आले. या घटनेने स्व. वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला आता चिरशांती लाभली आहे,’ अशी प्रतिक्रिया वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’कडे दिली.



शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री शालिनीताई म्हणाल्या की, ‘आजवर विश्‍वासघातकी राजकारण करणे पवारांना नडले असून राष्ट्रवादीमधील बंडाळीला प्रामुख्याने शरद पवार हेच जबाबदार आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांचाच आदर्श घेतलेला आहे. पूर्वी वसंतदादा यांचा विश्‍वास शरद पवारांच्यावर पूर्ण होता. या वेळी शरद पवारांचा विश्वास अजित  यांच्यावर होता म्हणूनच त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. तरीदेखील अजितदादांनी पाठीत खंजीर खुपसला. ४० वर्षांपूर्वी वसंतदादांना काय मानसिक त्रास झाला असेल याची अनुभूती शरद पवारांना आली असेल. जिथे पाप कराल तिथेच फेडावे लागते, असा नियतीचा नियम आहे,’ असा टाेलाही शालिनीताईंनी लगावला.