आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajit Pawar's 'that' Decision Is Personal, Now Only Election Is The Goal, Sharad Pawar's Explanation

अजित पवारांचा 'तो' निर्णय वैयक्तिक, आता फक्त निवडणूक हेच लक्ष्य, शरद पवारांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अजित पवार आणि त्यांचे काका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अनेकवेळा मतमतांतर पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मुद्द्यावरुन दोघांनी वेगवेगळी मतं मांडली होती. त्यानंतर शिवस्वराज्य यात्रेदरम्यान पक्षाच्या झेंड्यासोबत भगवा झेंडाही असेल, असे अजित पवारांनी म्हटले होते. पण आता तो निर्णय पक्षाच्या नसून, त्यांचा वैयक्तिक असल्याचे खुद्द शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.अजित पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले होते. अजित पवारांच्या या निर्णयावर बोलण्यास पक्षाच्या अनेक नेत्यांनी नकार दिला होता. इतके दिवस शरद पवार यांनी याबाबत शांत राहणे पसंत केले होते, पण नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला असता, पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, आहे तोच झेंडा राहिल. झेंड्याबाबतचे अजित पवार यांचे मत वैयक्तिक आहे. आता फक्त निवडणूक हेच लक्ष्य असेल, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...