आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाव्या बाेटांची ‘हवा’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जग किती पुढे गेलं, आता कुठे राहिलीत महिलांभोवती बंधनं आणि दडपणं? पुरुषसत्ताक पद्धती? हे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. मात्र, आजही स्त्रियांबद्दलची मानसिकता किती मागासलेली आहे याचा पोटात गोळा आणणारा प्रसंग बांगलादेशातील हवा अख्तर या तरुणीनं अनुभवला. परदेशी नोकरी करणारे तिचे पती रफिकुल सुटीनिमित्ताने घरी आले होते. हवाच्या पतीने प्रत्येकासाठी काही ना काही भेट आणली होती. हवाला अद्याप काही दिलं नाही म्हणून ती थोडी हिरमुसली होती. पण रात्री बेडरूममध्ये गेल्यावर पती म्हणाला, डोळे मिट, मी तुझ्यासाठी सरप्राइज गिफ्ट आणले आहे. हवाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिची उत्कंठा शिगेला पोहोचली. पतिप्रेमानं तिला भरून आलं. गिफ्ट देण्यासाठी पतीनं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. गिफ्टसाठी हात पुढे करायला सांगितले आणि चाकूच्या एका फटक्यात तिची बोटंच कापून टाकली...


हवाचा दोष इतकाच : कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यापूर्वी तिनं पतीची परवानगी घेतली नव्हती! ज्या बोटांनी शिक्षण घेण्याचं स्वप्न तिनं पाहिलं ती बोटंच त्यानं छाटून टाकली. तिच्यावर उपचार करण्यात आले. हवा म्हणते, उजव्या हाताची बोटं त्यानं छाटली, पण डाव्या हाताची आहेत ना अजून. वेदनेच्या प्रत्येक कळीसोबत तिचा शिकण्याचा निर्धार अधिकच भक्कम होतोय. उपचार घेऊन ती घरी परतेलही. पण पुरुषसत्ताक विचारांची कीड असलेल्या या व्यवस्थेवर उपचार कोण करणार हा प्रश्न मात्र बाकीच आहे.


 

बातम्या आणखी आहेत...