आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • AK 47 Burst Into The Police Station And Took Away A Bullet With A Prize Of Rs. 5 Lakh

पोलिस ठाण्यात घुसून एके-४७ने झाडल्या गोळ्या, ५ लाखांचे बक्षीस असलेल्या गुंडासही नेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बहरोड/ अलवर - राजस्थानातील अलवर येथे १५ -२० गुंडांनी शुक्रवारी भरदिवसा बहरोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत असलेला कुख्यात गुंड विक्रम  उर्फ पपला यास एके-४७ च्या फैरी झाडत पळवूून नेले. या गुंडांनी ५० फैरी झाडल्या. दरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे दहशतीखाली आलेल्या पोलिसांनी त्यांचा प्रतिकार करण्याएेवजी ठाणे सोडून पळून जाण्याचा मार्ग निवडला. काही पोलिस तर खोलीत लपून बसले होते. इतकेच नव्हे तर नाकाबंदी सुरू असताना, या गुंडांनी ठाण्यातील एक पिकअप व्हॅन व स्कॉर्पियो लुटून ही वाहनेही पळवून नेली. 

पोलिसांनी या गुंडास गुरूवारी रात्री झडती दरम्यान ठाण्यात आणले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी काही गुंड पोलिस ठाण्यात आले. त्यांच्याकडे एके-४७ व इतर हत्यारे होती. ठाण्यात घुसताच गुुंडांनी बेछूट गोळीबारास सुरूवात केली. पोलिसांनी सांगितले, पपलाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. याआधीही हरियाणातील महेंद्रगड येथे सुनावणीदरम्यान गुंडांनी त्याला न्यायालय परिसरातूनच सोडवून नेले होते. पोलिस आता फरार गुंडांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधून पकडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी पहाटे पोलिस संशयित वाहनांचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना तीन तरुण कार वेगाने तेथून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तेव्हा हायवे ओव्हरब्रिजच्या खाली गाडी सोडून तिघे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी दोघांना पोलिसांनी धरले. झडतीत त्यांच्याकडे ३१.९० लाख रुपये रोकड सापडली. सकाळी पपलाला सोडवून नेले तेव्हा त्यांची ओळख पटली.
 

पपला कुख्यात गुंड असल्याचे पोलिसांना माहितीच नव्हते!
पोलिसांनी पपलाला किरकोळ व्यापारी समजून थोडक्यात चौकशी केली. त्यानंतर त्याला कोठडीत ठेवले. सकाळी जेव्हा त्याचे साथीदार ठाण्यात पोलिसांना शिवीगाळ करत त्याला नावाने हाक मारली तेव्हा पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनी हरियाणा पोलिसांची कागदपत्रे तपासली तेव्हा तो कुख्यात इनामी गुंड निघाला. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यात चूक केली. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पपला कुख्यात गुंड असून हरियाणा पोलिसांनी त्याला जिवंत पकडणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, त्याने साथीदाराच्या सहकार्याने पलायनाची योजना आखली होती. 
 
 

बातम्या आणखी आहेत...