Home | Business | Gadget | akai-to-launch-new-television

भारतातील सर्वांत स्वस्त एलईडी टीव्ही

बिझनेस ब्यूरो | Update - May 21, 2011, 05:02 PM IST

अकाईने भारतीय बाजारात नवा स्वस्तातील एलईडी टीव्ही आणला आहे.

  • akai-to-launch-new-television

    ग्राहकोपयोगी विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणाऱया अकाईने भारतीय बाजारात नवा एलईडी टीव्ही आणला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा भारतीय उपलब्ध असलेला सर्वांत छोटा एलईडी टीव्ही आहे. या टीव्हीचा स्क्रिन १९ इंचाचा आहे. ज्यांच्या खोलीचा आकार लहान आहे, त्यांच्यासाठी हा टीव्ही उपयुक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.    आकाराने लहान असला तरी या टीव्हीमध्ये सर्वांत अत्याधुनिक फिचर वापरण्यात आले आहेत. या टीव्हीचा आवाजही सर्वोत्कृष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये डायरेक्ट यूएसबी कनेक्टिव्हीटीची सुविधा देण्यात आलीये. ज्यामुळे तु्म्ही पेन ड्राइव्ह वापरूनही टीव्ही बघू शकता. भारतीय बाजारात या टीव्हीची किंमत ११ हजार रुपये ठेवण्यात आलीये.Trending