आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या मुलाचे लग्न: पाहुण्यांच्या स्वागताची इतकी जय्यत तयारी, पाहा ग्रँड सेलिब्रेशनचे Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांचा आज (9 मार्च) विवाह सोहळा होत आहे. लग्नाचा विधी मुंबईच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. यासाठी ग्रँड तयारी करण्यात आली आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी जियो वर्ल्ड सेंटर आणि मुकेश अंबानी यांचे घर एंटीलियाला नववधूचे स्वरुप देण्यात आले आहे. लग्नापूर्वीच तयारीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशात यावर्षीच्या सर्वात मोठ्या लग्नसमारंभासाठी जगभरातील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश पाहुणे मंडळी गुरुवार आणि शुक्रवारीच लग्नस्थळाजवळ पोहोचले आहेत.


तीन दिवस चालणार फंक्शन
माध्यम रिपोर्टनुसार, 9 मार्च रोजी लग्नाचा विधी आणि डिनर आयोजित करण्यात आला. यानंतर संध्याकाळपासून तीन दिवस सेलिब्रेशन सुरूच राहील. जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पाहुण्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले. मग, 11 मार्च रोजी आकाश आणि श्लोका यांचा वेडिंग रिसेप्शन होणार आहे. यामध्ये उद्योग, स्पोर्ट्स आणि राजकीय मंडळींपासून बॉलिवुड सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.


2000 अनाथ आणि वृद्धांना जेवण
मुकेश आणि निता अंबानी यांनी बुधवारी लग्नाशी संबंधित अन्नसेवा कार्यक्रम सुरू केला. यामध्ये अंबानी दांपत्याने 2000 अनाथ मुलांना आणि वृद्धांना जेवण दिले. यादरम्यान आकाश आणि श्लोका यांनीही मुलांना जेवू घातले. अंबानी कुटुंबियांनी यापूर्वी मुलगी ईशा अंबानीच्या लग्नापूर्वी सुद्धा अन्नसेवा केली होती. त्यावेळी राजस्थानच्या उदयपूरमध्ये 5 हजारहून अधिक लोकांना जेवण देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...