आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाश अंबानी-श्लोका मेहता आज अडकणार लग्नाच्या बेडीत..ब्रिटनचे माजी पंतप्रधान सपत्नीक राहाणार उपस्थित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी आणि हीरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहता शनिवारी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. प्रीवेडींग सेरेमनी एक आठवड्यापासूनसुरु आहे. आकाश आणि श्लोका यांचा विवाह बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न होणार आहे. 

 

शाही विवाहासाठी अंबानी यांचे निवासस्थान 'एंटीलिया' सजविण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर, त्यांची पत्नी चेरी ब्लेयर आणि संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बान की मून उपस्थित राहाणार आहेत.

 

9 ते 11 मार्चपर्यंंत वेडिंग फंक्शन

- शनिवारपासून (9 मार्च) सुरु झालेला वेडिंग सेरेमनी 3 दिवस चालणार 

- आकाश अंबानी यांची वरात शनिवारी दुपारी 3.30 वाजता जियो सेंटरकडे न‍िघणार
- 6.30 वाजता, नाश्ता, सप्तपदीनंतर जियो वर्ल्ड सेंटरमध्ये डिनरचे आयोजन.
- 10 मार्चला संध्याकाळी 6.30 वाजता मंगल पर्व, त्यानंतर जियो वर्ल्ड सेंटरमध्ये डिनरचे आयोजन
 -11 मार्चला जियो वर्ल्ड सेंटरमध्ये ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन. या रिसेप्शनमध्ये बॉलीवुड, राजकीय नेते, क्रीडा आणि बिझनेस क्षेत्रातील दिग्गज पाहुणे सहभागी होती.

 

मुख्यमंत्री, अर्थमंत्र‍ी राहणार उपस्थित..
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्र‍ी पीयूष गोयल, सौदी अरबचे पेट्रोलियममंत्री खालिद अल फलीह आणि त्यांची पत्नी, बेल्जियमचेस राजकीय नेते राजनेता आणि यूरोपीय संसदेचे सदस्य वेरोनिक डी कीपर, काँग्रेस नेते आनंद शर्मा आणि अमेरिकन नेते एरिक कैंटर आदी उपस्थित राहाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...