आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाश-श्लाेकाच्या लग्नात जगभरातून आले वऱ्हाडी, बॉलीवूडमधील बडे स्टार वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश शनिवारी श्लोका मेहताशी विवाहबद्ध झाले. जगभरातून वऱ्हाडी मंडळी हजर होती. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, त्यांची पत्नी चेरी, संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस बान की मून, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, रतन टाटांसह बॉलीवूडमधील बडे स्टार वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

 

लग्नात सहभागी झालेले पाहुणे...
या विवाह सोहळ्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांच्या पत्नी चेरी ब्लेअर यांच्यासह संयुक्त राष्ट्रचे माजी प्रमुख बान की मून सहभागी झाले. आमिर खान, पत्नी किरण राव, संगीतकार विशाल अॅन्ड शेखर, अभिनेता जॅकी श्रॉफ, फॅशन डिजाइनर मनीष मल्होत्रा, श्रीलंकन क्रिकेटर जयवर्धने, सचिन तेंडुलकर, त्यांच्या पत्नी अंजली, शाहरुख खान, पत्नी गौरी खान, करण जोहर, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पत्नी अंजलि पिचाई, महेंद्राचे चेअर आनंद महिंद्रा यांनी देखील नवदांपत्याला आशीर्वाद दिला. उद्योगपति रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, अभिनेता रजनिकांत, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनीही आशीर्वाद दिला. यासोबतच फराह खान, क्रिकेटर पार्थिव पटेल, हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांच्यासह अभिनेत्री आलिया भट्ट, कियारा आडवाणी, जाह्नवी कपूर, अभिनेत्रा सिद्धार्थ मल्होत्रा, गायक मीका सिंह यांनीही उपस्थिती नोंदवली. यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते राजीव शुक्ला, अभिनेते अमिताभ बच्चन, पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता सुद्धा दिसून आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...