आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी बॉलिवुड गाण्यांवर थिरकली अंबानींची सून, मेहंदी सेरेमनीचा Video व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका 9 मार्च रोजी देशातील सर्वात धनाढ्य कुटुंब अंबानी कुटुंबाची सून बनली. श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांच्या लग्नापूर्वी मेहंदी सेरेमनी पार पडली. शुक्रवारी पार पडलेल्या या सोहळ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये श्लोका शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रीत 'तुझमें रब दिखता है' आणि 'पिया पिया' गाण्यावर थिरकताना दिसून आली. एवढेच नव्हे, तर चुनरीच्या परंपरेत ती बसल्या-बसल्या डान्स करत होती.


बालपणीचे मित्र-मैत्रिणी आहे आकाश आणि श्लोका...
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता बालपणीचे मित्र-मैत्रिण आहेत. दोघांचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आहे. श्लोका देशातील प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. अंबानी आणि मेहता कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मेहता कुटुंबीय सुद्धा मूळचे गुजराती आहेत. आकाशला लहानपणापासूनच श्लोका पसंत होती. त्यांनी लग्नापूर्वी गोव्यात पार पडलेल्या एका सोहळ्यात श्लोकाला लग्नासाठी प्रपोज केले होते. श्लोका कनेक्टफोर नावाच्या एका कंपनीची को-फाउंडर आहे. यातून एनजीओंना मदत केली जाते. श्लोका आपल्या वडिलांच्या कपंनीची संचालक सुद्धा आहे.

बातम्या आणखी आहेत...