आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकबर यांचा अब्रुनुकसानीचा दावा, 97 वकिलांची फाैज, पैकी 35 महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लैंगिक शाेषणाचा अाराेेप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणींविराेधात केंद्रीय राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी साेमवारी पतियाळा काेर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यांच्या वकीलपत्रावर एका लाॅ फर्मच्या ९७ वकिलांची नावे अाहेत, ज्यात ३५ महिला वकील अाहेत. 'प्रिया यांनी अामच्या बदनामीचा अजेंडा चालवला अाहे,' असे याचिकेत म्हटले अाहे. अकबर यांच्या वतीने दाेन ज्येष्ठ महिला पत्रकारांसह इतर ४ जण साक्ष देणार अाहेत. दुसरीकडे प्रिया रमाणी म्हणाल्या, 'एम.जे. अकबर अाम्हाला घाबरवून गप्प बसवू इच्छितात. मात्र मीही कायदेशीर लढाईस तयार अाहे.' 

 

'ते' घाबरवत अाहेत, मात्र मी तर लढणारच : प्रिया 
'राजकीय कटाचा अाराेप दु:खद, सत्य हाच माझा खरा बचाव अाहे' 

प्रिया यांनी टि‌्वट केले, 'अनेक महिलांनी अायुष्य पणाला लावून अावाज उठवलाय. त्यांच्या अाराेपांना राजकीय कट म्हणणे दु:खद अाहे. सत्य हाच माझा एकमेव बचाव अाहे.' प्रिया यांच्यासह गजाला वहाब, शुमा राहा, अंजू भारतींसह १२ महिलांनी अकबर यांच्यावर अाराेप केले. मात्र त्यांनी फक्त प्रियांवरच खटला दाखल केला.

 

अालाेक नाथांचाही नंदांवर दावा; हवी १ रुपयाची भरपाई 
लैंगिक शाेषणाचा अाराेप करणारी लेखिका, निर्माती विनता नंदा यांच्यावर ज्येष्ठ अभिनेते अालाेक नाथ यांनी मुंबई सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला अाहे. भरपाईपाेटी त्यांनी फक्त एक रुपया व लेखी माफीची मागणी केली अाहे. मात्र नंदांच्या वकिलांनीही ही न्यायालयीन लढाई अाम्ही लढणार असल्याचे सांगितले. 

 

लैंगिक शाेषणविराेधी कायदेशीर लढाई शक्य 
अकबर यांनी २ ज्येष्ठ महिला पत्रकारांसह इतर चार साक्षीदार तयार केले. 
लॉ फर्मच्या मते- ९७ वकिलांपैकी काेर्टात फक्त ६ जणच लढतील खटला 
प्रिया रमाणी दोषी सिद्ध झाल्यास दाेन वर्षांपर्यंत शिक्षा हाेऊ शकते 
दिल्लीच्या पतियाळा काेर्टात मंगळवारी हाेऊ शकते सुनावणी. 

बातम्या आणखी आहेत...