आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेधाचा ठराव घ्या : सावरकर परिवार; ...तर काळे झेंडे दाखवून निषेध : काँग्रेस

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष निवड वा मानपानावरून नव्हे, तर माजी संमेलनाध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात सावरकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. त्याच्या निषेधाचा ठराव ९३ व्या साहित्य संमेलनात घ्यावा, अशी मागणी वीर सावरकर विचार परिवारने साहित्य महामंडळाकडे केली आहे. असा ठराव घेतल्यास आम्ही संमेलनातच निषेध करू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

उस्मानाबादेत शुक्रवारपासून ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वीर सावरकर विचार परिवारच्या वतीने संमेलनाच्या स्वागतध्यक्षांना दिलेल्या निवेदनात सावरकरांविषयी सेवा दलाच्या पुस्तिकेतील मजकुरावर आक्षेप घेण्यात आला आहे. भोपाळच्या अधिवेशनात सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा असलेली ही पुस्तके वितरित केली गेली. १९३८ मध्ये मुंबईमध्ये पार पडलेल्या २३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर होते. त्यामुळे सावरकरांवरील वक्तव्याचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनात मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

..तर संमेलनाचा निषेध करू

संमेलनात सेवा दलाच्या निषेधाचा ठराव घेतल्यास काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत. या संमेलनाच्या संयोजन समितीमध्ये काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी असल्यामुळे संमेलनात असा कुठलाही ठराव घेतला जाणार नाही, मात्र तरीही तसा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू. - राेहित थिटे, जिल्हा उपाध्यक्ष, एनएसयूआय

आजपासून साहित्याचा जागर : उस्मानाबादेत आजपासून ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळचे संमेलन अराजकीय असल्याने कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीलाही व्यासपीठावर स्थान दिलेले नाही.

संमेलनात साकारले संत गोरोबाकाकांचे निवासस्थान

यंदा संमेलनात अनेक कलाकृती साकारण्यात आल्या असून त्यापैकी संत गोरोबाकाकांचे निवासस्थान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासमोर गाडगे बनवण्याचा आवा, शेणाने सारवलेले अंगण, अशी हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.

ना. धाें. महानाेर, साहित्य संमेलनाला जाऊ नका!

साहित्य संमेलनाचे नियाेजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटाेंपेक्षा अापण ज्येष्ठ अाहात. मराठी साहित्य चळवळीत अनेक नामवंत साहित्यिक असताना दिब्रिटाे अाम्हाला मान्य नाहीत. उद्घाटक म्हणून उपस्थित राहू नका, त्रास होईल, असा फाेन व पत्र अाल्याचे संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धाें. महानाेर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...