आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखिलेश यांची १ दिवसात १३ खाण योजनांना मंजुरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष, काँग्रेस व आप हे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ समोर आले. अवैध खाण प्रकरणात तत्कालीन खाण मंत्र्यांची चौकशी होऊ शकते, असे संकेत सीबीआयने दिले आहेत. 


सीबीआयने म्हटले, मुख्यमंत्रिपदासोबत खाण मंत्रालय सांभाळणाऱ्या अखिलेश यादव यांनी एका दिवसात १३ खाण योजनांना मंजुरी दिली होती. त्यांनी ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेचे उल्लंघन करत दिवसात १३ पट्ट्यांना मंजुरी दिली होती. तेव्हा त्यांनी एकूण १४ पट्ट्यांना मंजुरी दिली होती. त्यांनी १७ फेब्रुवारीला पट्ट्यांना मंजुरी दिली होती. हे पट्टे २०१२ मधील ई-कंत्राट धोरणाविरुद्ध दिले होते. 


अलाहाबाद उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०१३ रोजी आपल्या निकालात ही बाब मान्य केली.  विरोधकांनी एकजूट दाखवत सरकार सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप ठेवला. भाजप विरोध पक्षाला घाबरत असल्याचे अखिलेश रविवारी म्हणाले होते.