आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akhilesh Yadav Meets Mayawati, No Congress In UP Grand Alliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेशच्या महाआघाडीत काँग्रेसला स्थान नाही; मायावतींना भेटले अखिलेश यादव, जागावाटपाचा निर्णय लवकरच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ / नवी दिल्ली - समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुका एकत्रितरित्या लढणार आहेत. यासंदर्भात अखिलेश यादव यांनी शुक्रवारी दिल्लीत मायावतींची भेट घेतली. हे दोन्ही पक्ष राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेऊन लढण्यास तयार नाहीत असे सुत्रांकडून समजते. या आघाडीत छोट्या-छोट्या पक्षांना प्राधान्य दिले जाणार आहे. सोबत, जागा वाटपांवर अंतिम निर्णय 15 जानेवारीनंतर घेतला जाणार आहे.


काँग्रेससोबत छुपी आघाडी?
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीत काँग्रेसचा समावेश नसला तरीही त्यांची छुपी आघाडी असण्याची शक्यता नकारता येणार नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही पक्ष अमेठी आणि रायबरेलीत काँग्रेसच्या विरोधात आपले उमेदवार उतरवणार नाहीत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजीत सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) ला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आणि बसपांमध्ये 80 लोकसभा सीटपैकी 37-37 जागा आणि सहकारी पक्षांना इतर जागा देण्याचा विचार आहे. अखिलेश यांनी शुक्रवारी संध्याकाळी मायावती यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवर जवळपास दोन तास चर्चा झाली. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी दिल्लीत म्हटले आहे, की सपा आणि बसपामध्ये आघाडी होणे निश्चित झाले आहे. आघाडीत कोणते पक्ष असतील याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेणार आहेत.

 

महाराष्ट्र काँग्रेस, राष्ट्रवदी एकत्रित
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसने एकत्रितरित्या लढण्याचा निर्णय घेतला आहे. 48 पैकी काँग्रेस 20 आणि राष्ट्रवादी 20 जागांवर उमेदवार उतरवतील. तर उर्वरीत 8 जागांवर सहकारी पक्षांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला आहे. परंतु, 8 जागा कोणत्या पक्षांना दिल्या जाणार याचा निर्णय झालेला नाही.