आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Akhilesh Yadav Was Stopped At The Airport, Brother Dharmendra Yadav Was Beaten Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले, बंधू धर्मेंद्र यादवांना मारहाण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना मंगळवारी लखनऊच्या विमानतळावर रोखण्यात आले. त्यांना प्रयागराजला विद्यापीठातील पक्षाच्या विद्यार्थी संसदेच्या शपथ समारंभात सहभागी होण्यासाठी जायचे होते. तेथून ते कुंभाला देखील जाणार होते. अखिलेश यांना रोखल्यामुळे प्रयागराजसह अनेक जिल्ह्यांत सपा कार्यकर्त्यांनी निदर्शन व तोडफोड केली. प्रयागराजमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारात सपाचे खासदार धर्मेंद्र यादव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्ते जखमी झाले. 

 

अखिलेश यांना रोखण्यात आल्याच्या प्रकरणात विधानसभा तसेच विधान परिषदेत गदारोळ झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मायावती यांनीही अखिलेश यांची पाठराखण केली. देशात 'व्यत्ययाबद्दल दिलगीर आहोत.' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासही मनाई केली जात आहे, असे ममता म्हणाल्या. भाजप सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका मायावतींनी केली. 


प्रशासन व सरकारने बाँब फेकणाऱ्यांची मदत केली : अखिलेश यादव 
घटनेनंतर अखिलेश यांनी पत्रकार परिषद घेतली. अलाहाबाद विद्यापीठातील कार्यक्रमाबद्दलची माहिती आम्ही २७ डिसेंबर रोजीच कळवली होती. काही अडचण असल्यास लगेच माहिती व्हावी, असे वाटले. मात्र भाजप व त्यांचे समर्थक विद्यापीठातील निवडणुकीला आपली निवडणूक समजत होते. सरकार व सर्व मंत्रीही या निवडणुकीत सहभागी होत होते. आता शपथ समारंभ होत असताना तीन बाँब फेकले गेले. व्यासपीठाची जागी स्फोट झाला. प्रशासनाने हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. 

 

विद्यापीठाने केलेल्या आग्रहामुळे प्रशासनाचा निर्णय : आदित्यनाथ 
प्रयागराजमध्ये कुंभ मेळा सुरू आहे. आतापर्यंत अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. अखिलेश प्रयागराजमध्ये आल्यानंतर विद्यार्थी संघटनांत संघर्ष निर्माण होऊ शकतो,असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला. अराजक निर्माण होईल, अशा कार्यक्रमापासून सपाला रोखले पाहिजे, असा आग्रह विद्यापीठाने केला होता. सोमवारी त्यांचे पत्र मिळाले. कार्यक्रमात नेत्यांना परवानगी नव्हती, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. 
 

बातम्या आणखी आहेत...