आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच प्रयाेग यशस्वी हाेत नसतात; पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील धोरण ठरवू ; समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची टिप्पणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - आघाडी असूनही लाेकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाशी असलेली आघाडी ताेडण्याची घाेषणा दिल्लीत केली हाेती. आघाडीमुळे आम्हाला काहीही फायदा झाला नसल्याचे सांगून मायावतींनी काडीमाेड घेत असल्याचे स्पष्ट केले हाेते. त्यावर प्रतिक्रिया देताना सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे व मायावतींची आगामी विधानसभा पाेटनिवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर समाजवादी पक्षही सर्व नेत्यांशी चर्चा करून स्वबळावर निवडणूक लढवेल, असे गाझीपूर येथे मंगळवारी सांगितले हाेते. 

यानंतर बुधवारी यादव यांनी सांगितले की, बसपशी आघाडी करून आम्ही नवा प्रयाेग केला हाेता, जेणेकरून देशाला काही पर्याय मिळेल. मात्र, त्यात आम्ही अपयशी ठरलाे. त्यामुळे काेणताही प्रयाेग यशस्वी ठरेल असे नसते. तथापि, आपण जेव्हा काही नवीन करताे तेव्हा त्यात यशस्वी हाेऊच असे म्हणता येत नाही; परंतु अशा प्रयाेगांतून खूप काही शिकायला मिळते. त्यानुसार आम्हालाही या आघाडीतून खूप काही शिकायला मिळाले आहे व त्यातून धडा घेऊन आम्ही पुढील रणनीती ठरवणार आहाेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ते येथील एेशबागमधील ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले हाेते. त्या वेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.