आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अक्कलकाढा (अक्कलकरा)हे एक उपयोगी औषधी रोप आहे. याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येतो. प्राचीन काळापासूनच दातांशी संबंधित आजारांवर अक्कलकरा हा प्रभावी उपाय मानला गेला आहे. आदिवासी भागांमध्ये अक्कलकाढा शारीरिक शक्ती वाढवणारे आणि नपुंसकता दूर करणारे महत्त्वपूर्ण रोप मानले गेले आहे. अक्कलकाढाचे वनस्पतिक नाव स्पाईलेन्थस ओलेरेसिया असे आहे. आज आम्ही तुम्हाला अक्कलकाढाचे काही घरगुती उपाय सांगत आहोत.
- अक्कलकाढाच्या फुलं, मुळांचा काढा शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आदिवासींच्या माहितीनुसार अक्कलकाढाचा काढा दररोज 4 ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.
- गुजरात येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, अश्वगंधा, पुनर्नवा आणि अक्कलकाढा समान मात्रेमध्ये घेऊन, या मिश्रणाचे दिवसातून दोन वेळेस सेवन केल्यास शारीरिक कमजोरी दूर होते आणि ताकद वाढते.
- ज्या मुलांची जीभ जड असेल, तोतरे, बोबडे बोलत असतील त्यांना अक्कलकाढाच्या सुकलेल्या फुलांचे 250 मि. ग्रॅम. चूर्ण मधासोबत दिवसातून दोनवेळेस द्या. या उपायाने ही समस्या नष्ट होईल.
- अक्कलकाढाचे चूर्ण घेतल्यास अन्न पचण्यास मदत होते. यामुळे पोटात गॅस होत नाहीत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, याचे इतर फायदे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.