आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोले- अकोल्यात भागवत सांप्रदायिक लोकांनी व सर्व राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी रविवारी समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ अकोले शहर व तालुका कडेकोट बंद करून पाठिंबा दिला. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुद्धा सामील झाले होते.
रविवारी सकाळी नऊ वाजता शहरातील महात्मा फुले चौकातून समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ व भूमाता ब्रीगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या निषेधार्थ हजारांच्या संख्येने निषेध मोर्चा काढला. मोर्चाच्या प्रारंभी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या रहीवासी गाव असलेल्या इंदोरी पासून इंदोरी फाटा, साई लाॅन्स इंदोरी, मेहंदुरी, उंचखडक खुर्द, ढोकरी, अंबड, टाकळी, अगस्ति मंदिर, रेडे, सुगाव खुर्द, कुंभेफळ, कळस खुर्द, कळस बुद्रुक, सुगाव फाटा, महात्मा फुले चौक येथे शेकडोंच्या संख्येने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यानंतर महात्मा फुले चौकातून ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराजांच्या व हरिनामाच्या गजरात हा निषेध मोर्चा अकोले शहरातील बाजारतळावर आला.
तेथे मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. अध्यक्षस्थानी हभप विष्णू महाराज वाकचौरे होते. सभेच्या सुरूवातीला वारकरी संप्रदायातील महिला व पुरुषाच्या रांगा लावून टाळ मृदुंगाच्या जयघोषात हरिनामाचा गजर करून झाला. प्रास्ताविक अकोले तालुका वारकरी संप्रदायाचे माजी तालुका अध्यक्षपद हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले. व्यासपीठावर तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, मृृदुंगाचार्य, टाळकरी, सर्व राजकीय पक्षांच्या नेते व साामाजि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन हभप दत्ता महाराज नवले, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी केले. स्वागत प्ररदी हासे यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.