आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : दुचाकी अपघात; एक ठार, दोघे जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला- पातूर रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी १८ ऑगस्टला घडली. भरधाव दोन्ही दुचाकी वरखेड फाट्याजवळ एकमेकांना भिडल्या. या अपघातात शाम दयाराम काळे (वय १८, रा. म्हैसपूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कृषी नगरातील प्रदीप कांबळे, म्हैसपूर येथील वैभव महादेव आखरे हे दोघे गंभीर जखमी झाले.


हा अपघात एवढा भीषण होता की, दोन दुचाकींचा चुराडा झाला. दरम्यान उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे पातूरला जात होते. त्यांनी जखमींना सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करून घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांना दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या वेळी सर्वोपचारमध्ये सामाजिक कार्यकर्ते पराग गवई,संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, राष्ट्रवादीचे धर्मेद्र सिरसाट यांनी जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली.

 

बातम्या आणखी आहेत...