आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात इमारतीला भीषण आग, बचावकार्य करताना अग्निशामक दलाच्या दोघांना विजेचा जबर झटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोल्यात आज रविवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागलीे. मोहम्मद अली रोडवरील एका जुन्या इमारतीतील जोडे-चप्पलाच्या गोदामाला ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी २० बंब लागले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अग्निशामक दलाच्या गोपाल इंगळे आणि कलीम खान याला विजेचा जबर झटका बसला त्यात ते जखमी झाले आहेत.


पहाटे साडे पाच वाजता ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आगीत एक व्यक्ती जखमी झाला. मोहम्मद अली रोड हा अतिशय गजबजलेल्या लोकवस्ती आणि दुकानांचा भाग आहे. या आगीनंतर आजूबाजूच्या इमारती तातडीनं खाली करण्यात आल्या. आगीत एका सिलेंडरचा स्फोट झाला. तर दुसर्या सिलेंडरचा सिलेंडरचा स्फोट अग्नीशमन दलाच्या सतर्कतेनं टळला. सकाळी नऊच्या सुमारास ही आग पुर्णपणे आटोक्यात आली.  शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती सुत्रांनी दिली.


या आगीत दुकानातला संपूर्ण माल जळून खाक झाला. दरम्यान,महावितरणचे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी न पोचल्यामुळे लाईन बंद करता आली नाही. त्यामुळे आग विझवितांना अग्निशामक दलाच्या गोपाल इंगळे आणि कलीम खान याला विजेचा जबर झटका बसला.  हि बिल्डिंग संपूर्ण लाकडाची असल्यामुळे दोन मजली बिल्डिंग जळून खाक झालेली आहे..  आणि दुसरीकडं या बिल्डिंगमध्ये राहणारे भाडेकरू आहेत.. त्यां दोघांना रेस्क्यू करून खाली उतरवण्यात आलं.. हि आग इतकी भीषण कि आगीचे लोट आणि त्यातचं धुराचे लोट संपूर्ण परिसरातल्या आजू बाजूच्या बिल्डींग मध्ये पसरत होते. दुसरीकडे, या आगीमध्ये दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले तर धुरामुळे 2 स्थानिकांना दमकोंडी होऊन त्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...