आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सीसीटीव्ही,ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत राहणार गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग सीसीटीव्ही कॅमेरा व ड्रोन कॅमेऱ्याच्या निगरानीखाली पहिल्यांदाच असणार आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून अतिरिक्त कुमक शहरात दाखल झाली असून, त्यांनी संपूर्ण शहराचा ताबा घेतला आहे. 


विसर्जन मिरवणूक राजराजेश्वर मंदिर येथून जयहिंद चौक येथून सुरुवात होऊन गणेशघाट कोतवाली चौक येथे संपणार आहे मोठे गणपती हे भिकुण्ड नदी , बाळापूर व गांधीग्राम येथे विसर्जित केले जाणार आहेत, सर्व मिरवणूक मार्ग हा सीसीटीव्हीचे निगराणी खाली राहणार आहे, सर्व मिरवणूक मार्गावर बॅरेकेटींग करण्यात आली आहे. मिरवणुकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व रेकॉर्डिंगसाठी ड्रोन कॅमेरा ची मदत प्रथमच घेतली जाणार आहे. डीजे सुप्रीम कोर्टाने बंदी केली आहे. जो कोणी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करताना मिळून येईल त्यांचे क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजाचे रेकॉर्ड नॉइस लेवेल मीटरने चेक करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी मद्य विक्रीची दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. अवैध मद्य विक्री होणार नाही यासाठी विशेष पथक गठीत केलेले आहे. या विसर्जन मिरवणुकीत मद्य सेवन करून आल्यास ब्रिथ अॅनालायझर मीटरद्वारे तपासणी केली जाणार आहे, नागरिकांच्या सुविधा साठी प्रशासनाने ठिकठिकाणी मेडिकल उपचारासाठी अॅम्ब्युलन्स रुग्णवाहिका, अग्निशमन गाडी, क्रेन, बचाव पथक, पाण्यातील बोट, इमर्जन्सी लाइट जनरेटरची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे, जमावबंदी व शस्रास्त्रेसोबत बाळगण्यास बंदी करून मनाई आदेश काढण्यात आलेला आहे, पोलिस दल सोबत केंद्रीय पोलिस बल , राज्य राखीव पोलिस दल , होमगार्ड, वन विभाग, पोलिसमित्र, एनसीसी, शांतता कमिटीचे सदस्य या बंदोबस्त मध्ये सहभागी होणार आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करून अफवांवर विश्वास ठेवू नये, काही अनुचित प्रकार आढळून आल्यास नियंत्रण कक्षाच्या १०० व ११२ या दूरध्वनी क्रमांकावर फोनद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे. 


बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या सूचना 
पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी शनिवारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना बंदोबस्ताविषयी सूचना दिल्या. या बैठकीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस निरीक्षक विलास पाटील, संतोष महल्ले, किशोर शेळके, राजू भारसाकळे, शैलेश सपकाळ, वसंत मोरे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...