आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना जन्मठेपेची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 एप्रिल 2017 रोजी नराधमांनी 11 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केला होता

अकोला - टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्पलेक्समध्ये 2017 मध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला होता. या खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलॅंड यांच्या न्यायालयात झाली, न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  15 एप्रिल 2017 रोजी एका 11 वर्षीय चिमुकलीवर त्रिवेणेश्वर कॉम्पलेक्समध्ये सामुहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती.  या प्रकरणात पोलिसांनी आधी एका संशयीतास अटक केली होती. मात्र, पीडितेने दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपींची रेखाचित्र जारी केले होते. घटनेनंतर तीन दिवसांनी १८ एप्रिल २०१७ रोजी यातील आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहेत.   सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आर आर देशपांडे यांनी काम पाहिले.