Home | Maharashtra | Vidarva | Akola | Akola MP Sanjay Dhotre Suffered from heart Attack

अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका; तिकीट कापल्याची जोरदार चर्चा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 01:38 PM IST

2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते.

 • Akola MP Sanjay Dhotre Suffered from heart Attack

  अकोला- अकोल्याचे भाजपचे विद्यमान खासदार संजय शामराव धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अकोल्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून धोत्रे यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

  संजय धोत्रे यांचे तिकीट कापण्याने आहेत तणावात..

  लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र, भाजपकडून धोत्रे यांचे तिकीट कापण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ते तणावात आहे. या तणावातून त्यांना शुक्रवारी (ता.15) हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

  अकोल्यात भाजपमध्ये पडले दोन गट..

  अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. विकासकामे रखडल्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचे तिकीट कापणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते.

Trending