आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी म्हणाले, ... अन्यथा आम्ही पाणी सोडू; अभियंता: तोडगा काढण्यास मी येतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- धरणात पाणी उपलब्ध असूनही विविध यंत्रणांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना फळबागासाठी पाणीच उपलब्ध हाेत नसल्याचा प्रकार अकाेट तालुक्यात उजेडात अाला असून, याबाबत शेतकऱ्यांनी बुधवारी थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धाव घेत कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात ठिय्याच दिला. शेतकऱ्यांनी ४८ मिनिटे प्रतिक्षा केल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांचे अागमन झाले.पाेपटखेड धरणातून पाणी न मिळाल्यास अाम्ही स्वत:च पाणी साेडू असा इशारा अांदाेलकांनी दिला. यावर कार्यकारी अभियंत्यांनी मात्र सकारात्मकता दर्शवत पाणी साेडण्याच्या मुद्द्यावर मी स्वत: लवकरच तेथे येताे, अशी ग्वाही दिली.

 

गतवर्षीच्या तुलनेने यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजा सुखावला हाेता. मात्र नंतर वरुण राजाने विश्रांती घेतली. परिणामी खरीपातील उत्पादन घटले. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके, फळबागाच्या माध्यमातून तरी उत्पादन घेता येईल, असा िवचार शेतकऱ्यांनी केला. मात्र अकाेट तालुक्यातील शेतकरी हे स्वप्न भंगते की काय, अशी स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता बुधवारी समाेर अालेल्या प्रकारावरुन व्यक्त हाेत अाहे. पाेपटखेड धरणातून संत्रा फळबागेसाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख दिलीप बाेचे याच्यासह पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता सी. व्ही. वाकाेडे यांच्याशी चर्चा केली. या वेळी अंबाडी परिसरातील श्रीकांत रणगिरे, पंकज गट्टाणी, सागर जायले, रामेश्वर जायले, अलक थाेरात, गजानन वडतकार, सुदाम जायले, हरिराम भगत, माेहन भगत, राहुल साेनाेने, हरिकिसन जायले, शाम रणगिरे, राजू काेल्हे, अच्युत काेरपे, डिगांबर वडतकार अादींचा समावेश हाेता.

 

साहित्य पडून : पाेपटखेड धरण परिसरात विमोचकाच्या कामासाठी साहित्य येऊन पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकच राॅड लावणे बाकी अाहे. हे काम झाल्यास पाणी साेडता येईल. मात्र सध्या हे काम शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे. पाणी न मिळाल्याने कपाशीिपक वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रब्बी हंगाम लक्षात घेता िवमाेचकाचे काम वेळेत पूर्ण का झाले नाही, शेतकऱ्यांना वेळेत पाणी न मिळाल्यास , पिके न घेता अाल्यास काेण जबाबदार राहिल, असे एक ना अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत अाहेत.

धरणात पाणी उपलब्ध, समस्येसाठी विविध यंत्रणांची उदासीनता कारणीभूत
अकोट तालुक्यातील पाेटखेड धरणातून फळबागांना पाणी साेडण्यात यावे, या मागणीसाठी अकाेट तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या  कार्यालयात धाव घेतली.एकाच वेळी पाणी साेडल्याने दुचाकी गेली वाहून
शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागातील  कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच त्यांनी अापल्या भावनाही व्यक्त केल्या
१) गतवर्षी धरणाच्या कामासाठी एकाच वेळी पाणी साेडण्यात अाले हाेते. नाल्यातून तर चक्क एक दुचाकीच वाहून गेली हाेती. यंदाही धरणाच्या उर्वरित कामासाठी पााणी साेडण्यात येणार अाहे. मात्र हे पाणी एका महिन्यानंतर त्याचा उपयाेग शेतकऱ्यांना हाेणार नाही. ते पाणी नाल्यातून वाहून जाईल.
२) डाव्या कालव्याच्या विमोचकाचे  काम तात्काळ पूर्ण केल्यास आणि या कालव्यातून पाणी साेडल्यास त्याचा फायदा हाेईल. २५० हेक्टर क्षेत्र अाेलिताखाली येईल. विमाेचकाच्या कामाला वेळ लागत असल्यास तात्पुरता व्यवस्था म्हणून क्रेनच्या सहाय्याने गेट उचलून पाणी साेडावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे हाेते.
३) डाव्या कालव्यावर संत्राच्या फळबागा अवलंबून अाहेत. त्यामुळे वेळ गेल्यानंतर पाणी साेडल्यास त्याचा उपयाेग हाेणार नाही. फळबागा उद्धवस्त हाेतील. पाणी साेड्याच्या मागणीची दखल न घेतल्यास अामरण उपाेषणाशिवाय पर्याय राहणार नाही, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.


गुन्हा नोंदीनंतरही लढा देऊच
पाेपटखेड धरणातून पाणी साेडताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ३५३चा गुन्हा दाखल झाल्यानंतरही लढा देऊच असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख  नितीन देशमुख व शेतकऱ्यांनी दिला . धरणातून पाणी कसे साेडता येईल, हे पाटबंधारे विभागाच्या अकाेट येथील एका अभियंत्यांनी शेतकऱ्यांशी बाेलताना सांगितले  हाेते. हे त्या शेतकऱ्याने या अभियंत्यांच्या वरिष्ठांना सांगितली. त्यावर त्या वरिष्ठाने संबंधित अभियंत्यास धारेवर धरले हाेते, असे शेतकऱ्यांनी चर्चेत सांगितले. त्यामुळे अभियंत्यांनाच समस्यांवर ताेडगा कसा काढता येईल, हे माहीत असतानाही ते पुढाकार का घेत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात अाला.

 

दिलासा देण्यातही दिरंगाई
चारा व पिण्यासाठी पाणी असले तरी यंदा जिल्हयातच दुष्काळ अाहेच. त्यामुळे शासनाने बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शिटाकळी, अकाेला व तेल्हाऱ्यात दुष्काळी स्थिती जाहीर केली. मात्र यातून अकाेट व पातूरला वगळले. मात्र यातील काही गावांचा नंतर समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना धरणातील पाणी पिकांना  मिळण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या निमित्ताने हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...