आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपूर्वी अक्षरा हासनचे खासगी फोटो इंटरनेटवर लीक झाले होते. त्यानंतर अक्षराने मुंबई पोलिसात एफआयआर दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात तिचा एक्स बॉयफ्रेंड तनुज विरवानीचे नाव समोर आले आहे. अक्षराचे फोटो तनुजनेच लीक केल्याची चर्चा आहे. दोघे २०१३ पासून ते २०१७ पर्यंत एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे पोलिस त्याची विचारपूस करत आहेत. मात्र तनुज विरवानी म्हणाला.., या विषयाची माहिती मीडियाकडूनच मिळाली की, या प्रकरणात माझे नाव घेतले जात आहे. अजून पोलिसाकडून मला विचारपूस झाली नाही. मात्र मी पोलिसांचे सहकार्य करण्यासाठी तयार आहे. मला ते जे विचारतील त्याचे उत्तर मी देईल.
या प्रकरणानंतर अक्षराने तूला संपर्क केला होता का ? असे तनुजला विचारले असता तो म्हणाला..., अक्षरा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली हे मला माहीत होते. तिने मला याविषयी सांगितले होते. खरं तर, अशा प्रकरणात असेच करायला हवे. कारण जोपर्यंत आपण पोलिसांकडे जात नाही तोपर्यंत फोटो कुणी लीक केले कळणार नाही. जेव्हा हे फोटो लीक झाले तेव्हा अक्षराच्या मैत्रिणीने मला याची माहिती दिली होती. त्यानंतर मी अक्षराशी संपर्क केला होता. तेव्हा तिने मला विचारले होते की, तु असे केलेस का ? मी तिला म्हटले..., मी असे कधीच करू शकत नाही. मी ते फोटो अाधीच डिलीट करून टाकले होते. आता तर माझ्याकडे तो फोनदेखील राहिला नाही.
तनुज पुढे म्हणाला...,
अशा प्रकारच्या संवेदनशील फोटोपासून मी नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो. कारण हे आमच्या दोघांमधील सहमतीने झाले होते. शिवाय आमचा ब्रेक काही भांडणामुळे झाला नव्हता. आम्ही आजही एकमेकांची खूप काळजी घेतो. अक्षरा आजही माझ्यावर विश्वास ठेवू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.