आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमार एका वर्षात ७०० रुपये कोटी कमावणारा पहिला अभिनेता बनला आहे. २०१९ मध्ये त्याचे ४ चित्रपट ('केसरी', 'मिशन मंगल', 'हाउसफुल 4' आणि 'गुड न्यूज') रिलीज झाले. चारही चित्रपटांनी मिळून ७०० रुपये कोटींची कमाई केली.
अक्षयच्या चारही चित्रपटांची कमाई
चित्रपट - लाइफटाइम कलेक्शन
केसरी - 154.41 कोटी रुपये
मिशन मंगल - 202.98 कोटी रुपये
हाउसफुल - 4 194.60 कोटी रुपये
गुड न्यूज - 167.50 कोटी रुपये (कमाई सुरू आहे)
एकूण कमाई - 719.49 कोटी रुपये
प्रभासचा विक्रम अजूनही कायम
दुसरीकडे या यादीत दक्षिणेचा अभिनेता प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याने हिंदी बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाच्या बळावर एका वर्षात ५०० कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली. एस. एस. राजामौली दिग्दर्शित त्याच्या 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' (2017) च्या हिंदी व्हर्जनने ५१०.९९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
एका वर्षात सर्वात जास्त कमाई करणारे ५ स्टार
स्टार - वर्षे - संख्या - कमाई
1. अक्षय कुमार - 2019 - 4 चित्रपट - 719.49 कोटी रुपये
2. रणवीर सिंह - 2018 - 2 चित्रपट - 542.46 कोटी रुपये
3. सलमान खान - 2015 - 2 चित्रपट - 530.50 कोटी रुपये
4. प्रभास - 2017 - 1 चित्रपट - 510.99 कोटी रुपये
5. हृतिक रोशन - 2019 - 2 चित्रपट - 464.85 कोटी रुपये
बॉलीवूडकरांनाही कळाले कमी बजेटचे महत्त्व
गेल्या काही महिन्यांत कमी बजेटच्या चित्रपटांनीदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळे चित्रपटांचा एकूण खर्च कमी ठेवला पाहिजे, असे आता बाॉलीवूडकरांना समजू लागले आहे. मग तो कोणत्याही धाटणीचा असो. नुकताच रिलीज झालेला अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हे ताजे उदाहरण आहे. या कमी बजेटच्या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आतापर्यंत १६७.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यापूर्वीदेखील त्याच्या लो बजेट चित्रपटाने इतकीच कमाई केली होती. यात त्याचा 'मिशन मंगल' आणि 'केसरी'चादेखील समावेश आहे.
अक्षयचे मागील कमी बजेटचे चित्रपट आणि त्यांची कमाई
मिशन मंगल
केसरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.