आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगहुन परतून अक्षयने दिले ट्विंकलला अनोखे गिफ्ट, तिच्यासाठी आणले कांद्याचे ईअररिंग्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा खूप इंट्रेस्टिंग पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने एका आगळ्यावेगळ्या गिफ्टचा उल्लेख आपल्या इन्स्टाग्रामवर केला आहे. सोबतच याचा फोटोदेखील शेअर केला आहे. हे अनोखे गिफ्ट तिला अक्षय कुमारने दिले आहे. 

अक्षयने दिले कांद्याचे ईअररिंग्स... 

देशभरात कांद्याची किंमत 100 रुपये प्रति किलोच्या वर गेली आहे. अशात अक्षयने ट्विंकलला कांद्याचे ईअररिंग्स गिफ्ट देऊन हैराण केले आहे. ट्विंकलने ईअररिंग्सचे फोटोज शेअर करून लिहिले, ''माझे पती द कपिल शर्मा शोमधून परतले आहेत आणि तो म्हणाला, कांद्याचे ईअररिंग्स तिथे करिनाला हे दाखवले गेले, ते पाहून ती खूप इम्प्रेस झाली नाही. पण मला माहित होते, पण मला माहित होते तुला हे खूप आवडतील. म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आले.'' ''अनेकदा छोट्या आणि बालिश गोष्टीदेखील मनाला स्पर्श करतात. बेस्ट प्रेजेंट अवॉर्ड, कांद्याचे ईअररिंग्स.'' 

बातम्या आणखी आहेत...