आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : माझ्या आयुष्यावर वडिलांचा एक शिक्षक म्हणून पगडा आहे. त्यांच्यातील आदरभाव आणि मतांना मी फॉलो करत असल्याने आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ते एक स्टार तर होतेच, शिवाय त्यांच्यात एक सामान्य आणि हळवा माणूस होता, जो इतरांना आकर्षित करायचा. आयुष्यात त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, ते नेहमी विचार करायचे आपण कुठून आलो. याचे गूढ शोधण्यासाठी प्रगतीच्या शिखरावर असताना ते चित्रपटसृष्टी सोडून ओशोंना शरण गेले. तेथून ते परतले आणि त्यांनी इन्साफ या चित्रपटातून जोरदार पुनरागमन केले. त्यांनी आयुष्याची दुसरी इनिंगसुद्धा जोरदार खेळली.
ओशोंचे विचार माझ्या मनाचादेखील ठाव घेतात. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी यूट्युबवर त्यांचे प्रवचन ऐकतो. त्यांचे काही विचार मला खूप पटतात, मात्र काही विचारांशी मी सहमत नसतो. परंतु अधिक विचारांशी मी सहमत आहे. मला त्यांच्या गोष्टी चांगल्या वाटतात.
बढाया मारणे आवडत नसे...
खरं सांगायचं तर, वडील कधीही मोहमाया यांच्या फंद्यात पडले नाही. कारण या सर्व गोष्टींचे वैभव त्यांनी भोगलेले होते. त्यांच्या आयुष्यात या गोष्टींनी कधीच बांधून ठेवले नाही. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही त्यांनी त्यांचे विचार कधीच आमच्यावर थोपवले नाहीत. याबाबत ते खूप युनिक होते. काही जण एकदम आपले विचार दुसऱ्यावर थोपवतात पण, वडिलांनी असे कधीच केले नाही. अनेक वेळा मी त्यांना प्रश्न विचारायचो तेव्हा ते उत्तर द्यायचे. मात्र, बढाई मारत नसत. जगा आणि जगू द्या या विचाराचे होते.
मित्रांसाठी तयार असत
वडील मैत्रीवर खूप विश्वास ठेवत. भट्टसाहेब हे वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. जेव्हा कुणी निर्माता त्यांना भेटायचा तेव्हा ते भट्ट यांचे नाव सुचवायचे. इतके असूनही दोघांनी मिळून बनवलेला 'मुक्ती' हा चित्रपट पैशांअभावी तयार होऊ शकला नाही. अनेक वर्षांनंतर पुन्हा योग आला तेव्हा वडिलांनी भट्ट साहेबांचेच नाव पुढे केले. नंतर दोघांनी मिळून 'लहू के दो रंग' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट हाँगकाँगमध्ये शूट करण्यात आला.
काही न ऐकलेले किस्से
- विनोद यांचे पहिले प्रेम बॉलीवूड नव्हे तर क्रिकेट होते
- विनोद खन्ना यांना राजेश खन्नाचा अभिनय आवडायचा.
- ते सोमवार-शुक्रवार शूटिंग करायचे आणि सुटीच्या दिवशी ओशोंच्या आश्रमात राहायचे.
- ५ वर्षांनंतर परतल्यावर १९८८ मध्ये आपल्यापेक्षा २० वर्षांनी छोटी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत त्यांनी दयावान चित्रपट केला. यात अनेक बोल्ड दृश्ये केल्याने त्यांना लोक सेक्सी संन्यासी असे म्हणत.
- या चित्रपटात माधुरीसोबतच्या किसिंग सीनमध्ये ते इतके उत्तेजित झाले की, त्यांनी माधुरीच्या ओठाला चावा घेतला होता. सलमान खान विनोदला आपला लकी मॅन समजत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.