आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Ajay Devgan Ranveer Singh New Look From Their Upcoming Film Sooryavanshi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 सिम्बा, सूर्यवंशी आणि सिंघम आलेत एकत्र, अजय देवगण म्हणाला - 'माझी बिलकुल सटकली नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेतेे रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोत तिघेही पोलिस ऑफिसरच्या रुपात दिसत आहेत. तिघांचा हा फोटो आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटातील आहे.  

हा फोटो अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग या तिघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोबतच त्याला मजेशीर कॅप्शन दिले आहेत. 

अजय देवगणने फोटो शेअर करुन लिहिले, ''माझी बिलकुल सटकली नाही. सॅल्यूट सिम्बा, सूर्यवंशी आणि संघम, येतोय 27 मार्च 2020 ला.'' 

कतरिना कैफची महत्त्वाची भूमिका...
सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ झळकणार आहे. अलीकडेच कतरिनानेसुद्धा एक फोटो शेअर करुन चित्रपटातील अक्षयच्या पात्राचे नाव उघड केले होते. वीर सूर्यवंशी हे अक्षयच्या पात्राचे नाव आहे. रोहित शेट्टी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हैदराबाद येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...