आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय-रजनीकांत यांच्या चित्रपटाने रिलीजपुर्वीच मोडला 'बाहुबली 2'चा विक्रम, मिळाले सर्वात जास्त शो, 120 कोटीची अडव्हान्स बुकिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर मूव्ही '2.0' 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'रोबोट'चा सीक्वल आहे. यामध्ये रजनीकांत आणि ऐश्वर्या रायने काम केले होते. चित्रपटाने रिलीज होण्यापुर्वीच अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 543 कोटी रुपये खर्च झाले आहे. आतापर्यंत भारतीय चित्रपटांमधील हे सर्वात जास्त बजेट आहे. यासोबतच हा चित्रपट भारतात जवळपास  6600 ते 6800 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. म्हणजे '2.0' चित्रपट हा 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडणार आहे. 'बाहुबली 2' जवळपास 6500 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. 

 

चित्रपटाने रिलीज होण्यापुर्वीच 200 कोटी कमावले होते 
'2.0' चित्रपटाचे सेटेलाइट राइट्स जवळपास 110 कोटींमध्ये विकण्यात आले आहे. ही अमाउंट चित्रपटाचे तीन व्हर्जन(हिंदी, तामिळ आणि तेलुगु)साठी आहे. रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, मेकर्सने '2.0'चे थिएट्रिकल राउट 80 कोटी रुपयांमध्ये विकले आहेत. म्हणजेच चित्रपटाने रिलीजपुर्वीच 200 कोटी रुपयांच्या जवळपास कमाई केली आहे. यापुर्वी 'बाहुबली 2' च्या सेटेलाइट राइड्स 96 कोटी, 'दंगल'चे 75 कोटी, 'धूम 3' चे 75 कोटी 'दिलवाले'चे 60 कोटी, 'सुल्तान'चे 55 कोटी, 'रईस'चे 45 कोटी आणि 'काबिल'चे 45 कोटी रुपयांमध्ये विकले होते. 

'2.0' ला कुठे किती स्क्रीन मिळत आहेत 


नार्थ बेल्ट : 4000-4100 स्क्रीन
आंध्र प्रदेश/तेलंगाना : 1200-1250 स्क्रीन
तमिलनाडु : 600-625 स्क्रीन
केरळ : 500-525 स्क्रीन
कर्नाटक : 300 स्क्रीन
एकुण : जवळपास 6600 ते 6800 स्क्रीन

 

सर्वात जास्त शो मिळवणारा चित्रपट असेल '2.0'
हा चित्रपट 2 तास 28 मिनिटांचा आहे. चित्रपटाचा फर्स्ट पार्ट 69 मिनिटे(1 तास 9 मिनिट)चा आहे. तर दूसरा पार्ट 79 मिनिटे (1 तास 19) चा आहे. देशभरात चित्रपटाचे 32,000 ते 33,000 शो असतील. या हिशोबाने हा चित्रपट सर्वात जास्त शो मिळवणारा चित्रपट बनेल. यापुर्वी हा रेकॉर्ड 'बाहुबली 2'च्या नावे होता. 'बाहुबली 2' ला 31,000 शोसोबत रिलीज करण्यात आले होते. 

 

चित्रपटाला मिळाले अडव्हान्स बुकिंग 
2.0 चित्रपटाने रिलीजपुर्वीच अजून एक रेकॉर्ड बनवला आहे. 2.0 साठी जवळपास 120 कोटी रुपयांची अडव्हान्स बुकिंग करण्यात आली आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बालाने ट्वीट केले की, तामिळ चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्रपटाने 100 कोटींचा आकडा ओलांडला आहे. तामिळनाडुमध्ये 2.0 साठी केलेल्या अडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड झाला आहे. 

 

जगातील सर्वात महागड्या चित्रपटांमध्ये मिळाले स्थान 
2.0 जगातील टॉप 10 मेगा बजेट चित्रपटांमधून एक आहे. हा चित्रपट नवव्या स्थानावर आहे. 2.0चे VFX वर्क जगातील 24 स्पेशल VFX स्टूडियोजच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. चित्रपटाने अक्षय कुमार, रजनीकांत, एमी जॅक्सन प्रमुख भूमिकांमध्ये आहे. डायरेक्शन एक शंकरने केले आहे. म्यूझिकसाठी पहिल्यांदा 4 डी साउन्ड टेक्नीकचा वापर करण्यात आला आहे. याचे बॅकग्राउंड स्कोर तयार करण्यात एआर रहमानला 150 दिवस लागले होते.
 

बातम्या आणखी आहेत...