आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Applied For Indian Passport, Saying, "When Asked For Proof Of Being Indian, It Hurts"

अक्षय कुमारने भारतीय पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला, 'लोक भारतीय असल्याचा पुरावा मागतात'- अक्षय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयवर नेहमी भारतीय नसल्याचा ठपका मारला जातो

बॉलिवूड डेस्क- अभिनेता अक्षय कुमारने सांगितले की, त्याने भारतीय पासपोर्टसाठी अप्लाय केले आहे. तो म्हणाला की, खूप वाईट वाटंत जेव्हा कोणी भारतीय असल्याचा पुरावा मागतात. तो शुक्रवारी हिंदुस्तान टाइम्सच्या समिटमध्ये बोलत होता. यावेळी त्याने सांगितले की, मी भारतीय पासपोर्टसाठी अप्लाय केले आहे. 

कशी मिळाली कॅनडाचे नागरिकत्व
 
अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे, त्यामुळे त्याच्यावर नेहमी भारतीय नसल्याचा ठपका लावला जातो. समिटमध्ये बोलताना त्याने कॅनडाचे नागरिकत्व कसे मिळाले, याबाबत सांगितले. तो म्हणाला की, एक काळ होता, जेव्हा माझे एकापाठोपाठ एक 14 चित्रपट फ्लॉप झाले. तेव्हा पुढे काय करायचं असा मी विचार करू लागलो? तेव्हा मल कॅनडामध्ये राहत असलेल्या एका मित्राने तिथे येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा मला वाटले की, माझे फिल्म करिअर संपले आहे आणि म्हणून मी कॅनडाच्या पासपोर्टसाठी अप्लाय केले. पण, माझा 15 वा चित्रपट चालला आणि मग मी इथेच स्थायिक झालो. त्यानंतर मी पासपोर्ट बदलण्याचा कधीच विचार केला नाही. पण, आता माझ्या भारतीय असण्यावर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्यामुळे मी भारतीय पासपोर्टसाठी अप्लाय केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...