आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय Gay असल्याचा सासू डिंपलला होता संशय, लग्नापूर्वी ठेवली होती इतकी अजब अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गोल्ड' 15 ऑगस्टला रिलीझ होत आहे. अक्षय या चित्रपटात हॉकी प्लेअर बलबीर सिंग यांची भूमिका साकारत आहे. बलबीर सिंग 1948, 1952 आणि 1956 च्या इंडियन हॉकी टीमचे सदस्य होते. या टीमने ऑलिंपिक्समध्ये सलग तीन गोल्ड मेडल जिंकले होते. अक्षयच्या खासगी आयुष्यावर बोलावयाचे झाल्यास त्याचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला. अक्षयने 17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकलला आपली संगिणी बनवले. परंतु, त्यांच्या लग्नापूर्वीचा एका किस्सा खूप इंट्रेस्टिंग आहे. त्याने एकदा मुलाखतीमध्ये आपल्या सासू डिंपल कपाडिया यांच्याबाबत एक खुलासा केला होता. लग्नापूर्वी डिंपल अक्षयला Gay (समलैंगिक) समजत होत्या. त्यांना अक्षयवर इतका संशय होता, की त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावण्यापूर्वी एक अजब अट ठेवली होती. अक्षय आणि ट्विंकलने 2016 मध्ये ही गोष्ट शेअर केली होती.


या कारणाने अक्षय 'गे' असल्याची डिंपल यांना होती शंका...
शोमध्ये ट्विंकलने तिच्या लग्नाबद्दल सर्वात मोठा खुलासा केला की डिंपल कापडीया अक्षयला 'गे' समजत असे. डिंपल यांना त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने सांगितले की अक्षय 'गे' आहे. यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेकही केले. 


एक वर्ष Live-in मध्ये राहण्याची अट...
डिंपल यांनी अक्षय-ट्विंकलच्या लग्नाअगोदर त्यांना एक वर्ष लिव-इनमध्ये राहण्याची अट घातली. जर दोघांनाही त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नसेल तर लग्नाची परमिशन मिळेल असे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे दोघे एक वर्ष लिव इनमध्ये राहिले आणि मग लग्न केले. दोघांनी जानेवारी 2001 साली लग्न केले. ट्विंकलने आरवला 2002 साली जन्म दिला आणि 2012 साली मुलगी निताराला जन्म दिला. 


अक्षयला 15 दिवसांसाठी बनवले होते बॉयफ्रेंड
एका कार्यक्रमात ट्विंकलने खुलासा केला होता, की तिने देखील अक्षयसमोर लग्नासाठी एक अट ठेवली होती. तिने अक्षयला फक्त 15 दिवसांसाठी आपला बॉयफ्रेंड केले होते. अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा तिचा चित्रपट मेला रिलीझवर होता. आपला चित्रपट सुपरहिट ठरणार अशी तिला खात्री होती. त्यामुळेच, हा चित्रपट फ्लॉप झाल्यास तुझ्याशी लग्न करेन असे ट्विंकलने म्हटले होते. तिचा तो चित्रपट खरोखर फ्लॉप ठरला आणि लग्नासाठी होकार द्यावा लागला असे ट्विंकलने म्हटले होते.


रोज रात्री रमी खेळतात ट्विंकल-अक्षय...
अक्षय कुमार त्या कलाकारांपैकी एक आहे ज्यांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय नाही. अक्षय रात्री 9 ला झोपतो आणि सकाळी 4 ला उठतो. या लाईफस्टाईलमध्ये ट्विंकल पूर्ण साथ देते. ट्विंकलने सांगितले की अक्षय आणि मी रोज रात्री झोपण्यापूर्वी रमी खेळतो. 


अक्षयने गायले होते गाणे...
कॉफी विद करणच्या एपिसोडमध्ये पहिल्यांदा असे झाले की कोणा सेलिब्रेटीने पत्नीसाठी गाणे गायले. एक महिना प्रॅक्टीस करुन अक्षयने हे गाणे गायले. अक्षय गाणे म्हणत होत तेव्हा ती भावूक झाली होती.

बातम्या आणखी आहेत...