आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : अक्षय कुमारचा 'गोल्ड' चित्रपट बॉक्सऑफिसवर शानदार कमाई करत आहे. चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात 72 कोटींची कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचा प्रत्येक चित्रपट चांगली कमाई करतोय. यामुळे तो सध्या इंडस्ट्रीतील सर्वात प्रॉफिटेबल स्टार्सपैकी एक आहे. अक्षय फक्त बॉक्सऑफिसवरच पुढे नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही त्याने तिन्ही खान(आमिर, सलमान, शाहरुख) ला मागे टाकले आहे. ताज्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार हा इंस्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोअर्स पुर्ण करणारा पहिला बॉलिवूड स्टार बनला आहे.
अमिताभ बच्चनलाही सोडले मागे
इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत अक्षय कुमारने तिन्ही खानला मागे टाकलेच. यासोतबच अमिताभ बच्चन यांनाही त्याने मागे टाकले आहे. बिग बींचे इंस्टाग्रामवर फक्त 9.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान आणि अजय देवगण दिर्घकाळापासून इंस्टाग्रामर आहेत. तर आमिर खानने काही दिवसांपुर्वीच इंस्टाग्राम जॉइन केले आहे. यामुळे त्याचे इंस्टाग्रामवर फक्त 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
टॉप-6 सुपरस्टार्सचे इंस्टाग्राम फॉलोअर्स
अक्षय कुमार | 20.4 मिलियन |
सलमान खान | 17.9 मिलियन |
शाहरुख खान | 13.9 मिलियन |
अमिताभ बच्चन | 9.8 मिलियन |
अजय देवगन | 3.7 मिलियन |
आमिर खान | 1.4 मिलियन |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.