आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सौगंध\' ते \'गोल्ड\'पर्यंत: 27 वर्षांच्या प्रवासात असा बदलत गेला अक्षयचा LOOK

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः हॉकी या खेळावर आधारित अभिनेता अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर हा चित्रपट भाष्य करतो. स्वतंत्र भारतासाठी हॉकी या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न तपन दासचं असतं आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी तो खेळाडूंना कशाप्रकारे एकत्र आणतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तपन दासची भूमिका अक्षयने या चित्रपटात वठवली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली लंडनमध्ये झालेल्या 14व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. अक्षय कुमारसोबतच चित्रपटामध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात अक्षय बंगाली लूकमध्ये दिसतोय. 

 

'सौंगध'पासून ते 'गोल्ड'पर्यंत.. अनेकदा बदलला अक्षयचा लूक 
अक्षयने 1991 मध्ये 'सौगंध' या सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. त्यावेळी सडपातळ असलेल्या अक्षयचे केस बरेच मोठे होते. त्याकाळात लांब केसांची फॅशन होती. मात्र जसजसे अक्षयचे करिअर पुढे सरकले, तसतसा त्याच्या लूकमध्ये बदल घडत गेला. 27 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांत अक्षय कधी लहान तर कधी लांब केसांत दिसला. इतकेच नाही तर कधी पोनी, कधी जीरो मशीन, कधी पगडी, तर कधी मिशीत अक्षय दिसला.


अक्षयच्या सिनेमांतील असेच काही निवडक लूक आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्मध्ये पाहा अक्षयचे निवडक लूक...

बातम्या आणखी आहेत...