आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay Kumar Completes Shooting For The Show 'In To The Wild With Beer Grills', Some Photos Of Shooting Go Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन टू द वाइल्ड विद बिअर ग्रिल्स शोसाठी अक्षय कुमारने पूर्ण केले शूटिंग, बिअर ग्रिल्सच्या शोमधील काही फोटो व्हायरल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रजनीकांत यांच्यानंतर आता अक्षय कुमारने बिअर ग्रिल्सचा नवा शो 'इन टू द वाइल्ड विद बिअर ग्रिल्स' साठी शूटिंग केली, जी कर्नाटकच्या बांदीपुर टायगर रिझर्व्ह आणि नॅशनल पार्कमध्ये झाली. शूटमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अक्षय ग्रिल्स, शोची टीम आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांसोबत दिसत आहेत. रिपोर्ट्नुसार, बिअरला अक्षयसोबत 5 लोकेशंसवर शूटिंग करायचे होते. पण तो केवळ 2 जागीच शूट करून तेथील निघाला. ग्रिल्स, त्याची टीम आणि अक्षयने सुमारे 3 तास शूटिंग केले.  

दीपिका आणि विराटदेखील करू शकतात शूटिंग... 

रिपोर्ट्सनुसार, यहेदेखील सांगितले जात आहे की, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि क्रिकेटर विराट कोहलीदेखील ग्रिल्ससोबत जंगलांमध्ये शूट करतील. या दोघांसोबत आणखीही काही सेलिब्रिटी या शूटचा भाग बनू शकतात. जर असे झाले तर. ग्रिल्ससोबत शूट करणारी दीपिका पहिली पहिली बॉलिवूड अभिनेत्री आणि कोहली पहिला भारतीय क्रिकेटर असेल. पहिले इंडियन अभिनेते म्हणून ग्रिल्ससोबत रजनीकांत यांनी शूटिंग केले होते. हे शूटिंग 28 जानेवारीला बांदीपुर टायगर रिझर्व्हमध्ये झाले होते.