आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथचा पहिला चित्रपट करताच अक्षय कुमारला दिसू लागल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये उणीवा, '2.0'च्या दिग्दर्शकाला सांगितले 'अवतार'च्या दिग्दर्शकापेक्षा हुशार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिग्दर्शक एस. शंकर यांचा '2.0'  हा चित्रपट रिलीज झाला आहे. 2010 मध्ये आलेल्या 'रोबोट'च्या या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षयने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. पहिल्याच दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यानंतर आता अक्षय कुमारला बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये मात्र उणीवा जाणवू लागल्या आहेत.

 

अक्षयने काढल्या उणीवा...
- अक्षयने एका मुलाखतीत म्हटले, "साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री बॉलिवूडच्या तुलनेत खूप प्रोफेशनल आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याची पद्धत अतिशय कमकुवत आहे. दक्षिणेत मात्र शूटिंगची वेळ सकाळी 7.30 ची असेल तर 7.30 वाजताच शूटिंगला सुरुवात होते. तर बॉलिवूडमध्ये मात्र सकाळी 7.30 ची वेळ दिल्यानंतर शूटिंग मात्र 9.30 वाजता सुरु होतो. दाक्षिणात्य सुपरस्टार्स वेळेत शूटिंग सेटवर पोहोचत असतात."


- अक्षयने पुढे सांगितले, "दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रोफेशनल असल्याचे महत्त्व वेगळे आहे. येथे तुम्ही बरंच काही शिकू शकता. ते एका दिवसात 30 ते 40 शॉट्स घेतात, तर बॉलिवूडमध्ये आम्ही 12 ते 13 शॉट्सच घेऊ शकतो. ते जलद गतीने काम करतात. इतरांचा फायदा घेत नाहीत. दुस-यांच्या वेळेला आणि कामाला प्राधान्य देतात."

 

'2.0' हा चित्रपट हॉलिवूडमध्ये बनला असता तर बजेट असते 8670 कोटी रुपये...
 - मुलाखतीत अक्षयने सांगितले की, '2.0' हा चित्रपट फक्त 510 कोटींमध्ये बनला आहे. एवढ्या रकमेत हॉलिवूडमध्ये चित्रपट बनत नाही. अक्षय म्हणतो, "आपण हॉलिवूडशी तुलना करु शकत नाहीत. कारण त्यांचे बजेट आपल्यापेक्षा 17 पटीने अधिक असते. विश्वास ठेवा, ते लोक 510 कोटींत आम्ही जे बनवले ते बनवूच शकले नसते."  अक्षयच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर, हॉलिवूडमध्ये '2.0' या चित्रपटावर 8670 (510 x17) कोटी रुपये खर्च झाले असते.

 

ओरिजिनल 3 D फिल्म आहे '2.0'
- अक्षय कुमारने सांगितल्यानुसार, '2.0' ओरिजिनल 3 D चित्रपट आहे. या 3 Dमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यात आलेले नाही. अक्षयने हॉलिवूडमध्ये 'अवतार'सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक जेम्स कॅमरूनसोबत दिग्दर्शक एस. शंकर यांची तुलना करताना म्हटले की, कॅमरून 510 कोटींच्या बजेटमध्ये असा चित्रपट बनवू शकले नसते. 
 

बातम्या आणखी आहेत...