आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Failed To Make Coffee, Wife Twinkle Shared A Photo And Wrote, 'I Never Told Him This Again'

कॉफी बनवण्यात अयशस्वी ठरला अक्षय, पत्नी ट्विंकलने फोटो शेअर करून लिहिले, 'यामुळे मी त्याला पुन्हा कधीच सांगितले नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री आणि ऑथर ट्विंकल खन्नाने सांगितले की, तिचा पती सुपरस्टार अक्षय कुमार कॉफी बनवण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. बुधवारी इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षय कॉफीची कप-प्लेट पकडलेला दिसत आहे. ट्विंकलने कॅप्शनमध्ये आपल्या फॉलोअर्सला सांगितले की, या इंसिडेंटनंतर तिने कधीच अक्षयला कॉफी बनवायला सांगितले नाही.  

ट्विंकलने कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, "रायटर्ससाठी कॅफीन तेवढे गरजेचे आहे, जेवढी एका पेन्सिलला ग्रॅफाइटची आवश्यकता असते. पण हेच कारण आहे की, मी त्याला कधीच नंतर माझ्यासाठी कॉफी बनवायला सांगितले नाही." 

सोशल मीडियावर आल्या या कमेंट्स...  


ट्विंकलच्या फोटोवर कमेंट करून तिच्या एका फॉलोअरने लिहिले, "त्यांनी कॉफीसाठी फिल्टरचा वापर केला नव्हता का" आणखी एका यूजरची कमेंट आहे, "त्यांनी कपमधून काही कॉफी फेकण्याचा प्रयत्न केला होता का" एका यूजरने लिहिले, "कपच्या किनाऱ्यावर ग्रॅफाइट आहे." एकाने लिहिले, "हाहाहा...हे हास्यास्पद आहे."


अक्षय कुमार सध्या आपला चित्रपट 'गुड न्यूज' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. राज मेहताच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात अक्षयसोबत करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि किआरा आडवाणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.