आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होणा-या सास-यानेच एकेकाळी अनेक तास प्रतिक्षा करायला लावून भेटण्यास दिला होता नकार, आज 4 दिवसांत चित्रपटाने कमावले 100 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सध्या अक्षय कुमारचाय 2.0 चित्रपट चांगली कमाई करत आहे. अक्षय आणि रजनीकांतच्या 2.0 चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली आहे. तर हिंदीमध्ये चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. ऐकेकाळी अक्षय कुमारला बॉलिवूडने हिरो मानण्यास नकार दिला होता. वेळ बदलली आणि आज त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे यश त्याच्या नावावरच ठरते. 


वेटरपासून सुपर स्टारचा प्रवास 
अक्षयने आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बँकॉकमध्ये वेटर आणि शेफची नोकरीही केली आहे. तो मुंबईमध्ये आला तेव्हा त्याला खुप स्ट्रगल करावा लागला. एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना स्वतः अक्षय कुमार म्हणाला होता की, त्याला कोणत्याही मोठ्या बॅनरने घेतले नाही, त्याला नेहमी बी-ग्रेड चित्रपट ऑफर केले जात होते. अक्षयनुसार, त्याने जास्तीत जास्त काम नवीन डायरेक्टरसोबत केले आणि आपली ओळख बनवली. मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट असलेल्या अक्षयचा डेली रुटीनही सर्वांना इम्प्रेस करतो. अभय दारु-सिगारेटपासून दूर राहतो. तो लवकर उठतो आणि लवकर झोपतो. अक्षयच्या फिटनेसचे सर्व फॅन आहेत. 50 वर्षांचा असूनही अभय चित्रपटांमध्ये स्वतःचे स्टंट्स स्वतः करतो.

 

कमाईच्या बाबतीत सलमानपेक्षा पुढे 
मैं खिलाड़ी-तू अनाड़ी, हाउसफुल, हेराफेरी, बेबी, टॉयलेट-एक प्रेमकथा, पॅडमॅन सारखे सुपरहिट चित्रपट केलेला अक्षय कमाईच्या बाबतीत सलमान-शाहरुखपेक्षा पुढे आहे. जुलैमध्ये आलेल्या फोर्ब्सच्या 2018 च्या सर्वात जास्त कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये अक्षय 76 कोटींवर होता तर सलमान 82 व्या स्थानावर होता. फोब्सने म्हटले की, अक्षयने यावर्षी 4.05 कोटी डॉलरची कमाई केली. 

 

जे कुणी करत नाही, त्या भूमिका करुन सर्वांना इम्प्रेस करतो अक्षय 
अक्षय बॉलिवूडमध्ये नवनवीन भूमिकांवर प्रयोग करणारा अभिनेता आहे. तो रिस्क घ्यायला घाबरत नाही. अॅक्शन, कॉमेडीसोबतच अक्षयने सोशल मॅसेज देणारे अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये टॉयलेट, पॅडमॅन यांसारख्या चित्रपटांसमावेश आहे. यामुळे त्याचे स्थान इतर कलारांपेक्षा वेगळे आहे. 

 

मेहनतीमुळे हे सर्व मिळवले
अक्षय एक असा स्टार आहे जो आपल्या डेली लाइफ स्टाइलसोबत अजिबात समझोता करत नाही. सकाळी लवकर उठणे, दारु-सिगारेटपासून दूर राहणे या त्याच्या विशेषता आहेत. 50 वर्षांचा असूनही अक्षय एकदम फिट आहे. खिलाडी कुमार आजही त्याचे स्टंट स्वतः करतो.

 

अफेअर्स नेहमी चर्चेत 
90 च्या दशकात अक्षयचे नाव अनेक हिरोइन्ससोबत जोडले गेले. यामध्ये रवीना टंडन, शिल्पा शेट्टी तर कधी प्रियांका चोप्राचेही नाव आले. पण रेखासोबतच्या जवळीकमुळे तो सर्वात जास्त चर्चेत आला. याविषयी दोघांनी कधीच वाच्यता केली नाही, पण 'सबसे बडा खिलाडी' चित्रपटादरम्यान त्या दोघांची जवळीक खुप वाढली होती असे बोलले जाते. 

 

ज्यांनी तासंतास प्रतिक्षा करायला लावली, त्यांचाच जावई बनला 
1990 चा काळ होता. सुपरस्टार राजेश खन्ना 'जय शिव शंकर' चित्रपट बनवत होते. यामध्ये त्यांनी डिम्पल कपाडियाला घेतले होते. जीतेंद्र यांनाही साइन केले होते. त्यांना एक नवीन चेहरा हवा होता. तेव्हा अक्षय कुमार तिथे गेला, त्या काळात तो कामाच्या शोधात डायरेक्टर्स आणि स्टूडियोमध्ये फे-या मारत होता. 3-4 तास प्रतिक्षा करुनही तो काकांना भेटू शकला नाही. पण वेळ बदलली, त्याचे ट्विंकल खन्नासोबत लग्न झाले आणि त्याच राजेश खन्ना यांचा तो जावई बनला.

 

पीएम मोदीचा सर्वात आवडता स्टार 
फिल्म इंडस्ट्री बाहेरही अक्षयच्या चर्चा आहेत. त्याच्या चित्रपटांमुळे नरेंद्र मोदींचा तो आवडता आहे. स्वच्छता अभियानावर आधारित टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपटाची खुप प्रशंसा झाली. तसेच पॅडमॅनच्या माध्यमातून तो सर्वांच्या घराघरात पोहोचला. हे दोन्हीही चित्रपट टॅक्स फ्री झाले. यासोबतच बेबी आणि एयरलिफ्टमधून त्याने लोकांच्या मनापर्यंत पोहोचला. 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...