आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Finished The Action Schedule Of The Sooryavanshi Film. Shared A Photo

अक्षयचे अॅक्शन शेड्यूल संपले, यामुळे फाइट मास्टरवर रोखली बंदूक; म्हणाला - ...तेव्हा फाइट मास्टरला शूट करने बाकी राहते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार 'सूर्यवंशी' चित्रपटात प्रथमच एकत्र काम करत आहेत. रोहितने सूर्यवंशीची घोषणा आपला शेवटचा चित्रपट सिंबाच्या क्लायमेक्समध्ये केली होती. तेव्हापासून 'सूर्यवंशी' चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरीना कॅफ मुख्य भूमिकेत आहे. अक्षयने नुकतेच अॅक्शन शेड्यूल पूर्ण केले. आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत याची माहिती दिली. 

 

फाइट मास्टरवर रोखली बंदूक
अक्षयने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षयसोबत रोहित शेट्टी आणि सह कलाकारांनी एका व्यक्तीवर बंदूक रोखून धरलेली दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'जेव्हा तुमची अॅक्शन संपते तेव्हा फक्त फाइट मास्टरला शूट करने बाकी राहते. इतक्या अॅक्शन सीन्समधून आम्हाला सुखरूप बाहेर काढल्याबद्दल त्या व्यक्तीचे आभार आणि प्रेम'

 

 

सलमानमुळे बदलली रिलीज डेट 
सूर्यवंशीमध्ये गुलशन ग्रोवर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुढील वर्षी 27 मार्च रोजी सूर्यवंशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2020 मध्ये ईदच्या दिवशी सूर्यवंशी प्रदर्शित होणार होता. पण सलमानच्या इंशाअल्लाहमुळे रोहितला आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.