Home | News | Akshay Kumar Fitness Secret On His Birthday

वयाच्या 51 व्या वर्षीही या 9 नियमांमुळे फिट आहे अक्षय कुमार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 05:09 PM IST

अक्षय कुमार आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करतोय. 9 सप्टेंबर 1967 मध्ये अमृतसर, पंजाबमध्ये अक्षयचा जन्म झाला.

 • Akshay Kumar Fitness Secret On His Birthday

  हेल्थ डेस्क: अक्षय कुमार आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करतोय. 9 सप्टेंबर 1967 मध्ये अमृतसर, पंजाबमध्ये अक्षयचा जन्म झाला. वयाच्या 51 व्या वर्षीही अक्षय कुमार जबरदस्त फिट आहे. संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तो पार्टीज आणि अल्कोहलपासून दूर राहण्यासाठी ओळखला जातो. तो नियमित सकाळी 4.30 वाजता उठतो आणि रात्री 9 वाजता झोपतो. तो नाइट शिफ्ट अव्हॉइड करत असतो. आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी तो आठवड्यातून दोन-तीन वेळा बास्केटबॉल खेळतो. वेळ मिळाल्यावर तो मुलासोबत स्विमिंगही करतो. आपले फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी तो 9 नियम अनेक वर्षांपासून फॉलो करतोय.


  डायटमध्ये काय घेतो
  - ब्रेकफास्ट : पराठा, एक ग्लास दूध, ज्यूस किंवा मिल्कशेक आणि अंडी
  - स्नॅक्स : फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स आणि मिक्स हिरव्या भाज्या
  - लंच : डाळ, चपाती, हिरव्या भाज्या बॉइल्ड चिकन आणि दही
  - डिनर : सूप, हिरव्या भाज्या आणि सलाद
  - त्याला ब्राउन राइस खायला आवडते.

  हे 9 नियम करतो फॉलो
  - तो संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत डिनर करुन घेतो. झोपण्याच्या 4-5 तासांपुर्वी जेवूण घ्यावे असे तो मानतो. यामुळे जेवण पुर्णपणे डायजेस्ट होण्यास वेळ मिळतो.
  - तो प्रोटीन शेक घेत नाही. यामुळे दिर्घकाळानंतर दुष्परिणाम होतात असे तो मानतो.
  - तो साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात खातो. हेल्दी राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचे तो मानतो.
  - तो निमयित कमीत कमी अर्धा तास मेडिटेशन करतो. यामुळे शांती मिळते आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते.
  - तो आपल्यासोबत नट्स आणि फ्रूट्स ठेवतो. जेव्हा भूक लागेल तेव्हा हे पदार्थ खातो.
  - दिवसभरात तो 4 ते 5 लीटर पाणी पितो.
  - मेटाबॉलिज्म रेट वाढवणारे पदार्थ तो खातो. तो मानतो की, मेटाबॉलिज्म योग्य असेल तर फिटनेस राहतो आणि वजन वाढत नाही.
  - तो कधीच जास्त जेवण करत नाही. तो थोड्या-थोड्या अंतराने खातो.
  - ज्यावेळी तो एक्सरसाइज करत नाही तेव्हा तो 15 ते 20 मिनिटे क्विक वॉक घेतो. रोज तो काहीना काही फिजिकल अॅक्टिव्हिटी अवश्य करतो.

Trending