आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Gave 2 Crores To Help The People Of Assam, Priyanka Chopra Also Appealed For Help

आसामच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अक्षय कुमारने दिले 2 कोटी, प्रियांका चोप्रानेदेखील केली मदतीसाठी अपील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार आपल्या चित्रपटांबरोबरच आपल्या दयाशीलतेसाठी ओळखला जातो. अशातच अक्षयने आसाम आणि काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये पूरग्रस्तांसाठी 1-1 करोड़ देण्याची घोषणा केली आहे. अक्षयने याच गोष्टीची माहिती ट्वीट करून दिली. 

 

फॅन्सला केली मदतीसाठी अपील... 
अक्षयने ट्वीटमध्ये आसाममध्ये झालेल्या विध्वंसाबद्दल कळल्याने खूप दुखी आहे. या कठीण प्रसंगी मनुष्य आणि प्राणी दोघांची मदत करणे गरजेचे आहे. सीएम मदत निधी आणि काजीरंगा नॅशनल पार्कचे रेस्क्यू दोन्हींसाठी 1-1 कोटी रुपये दान करू इच्छितो आणि इतरांनाही मदतीची अपील करत आहे.  

 

प्रियांकानेदेखील केली मदतीची अपील... 
अक्षयव्यतिरिक्त प्रियांका चोप्रानेदेखील ट्वीट करून सीएम फंडमध्ये डोनेशन देण्याची अपील केली आहे. प्रियांकाने लिहिले, 'आसाममधून येत असलेल्या बातम्यांमुळे खूप दुखी आहे. लोक बेघर झाल्याचा खूप त्रास होतो आहे. मदतीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

 

 

 

अशी आहे सद्य परिस्थिती... 
आसाममध्ये पुरामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 46 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आसाम राज्याच्या आपत्ती प्रबंधन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार सोमवारपर्यंत 4175 गावांमध्ये सुमारे 46.28 लाख लोक पुराचा सामना करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच 90 हजार हेक्टेयर शेतजमीनदेखील पुरामुळे उद्धस्त झाली आहे. तसेच काजीरंगामध्ये 10 लाखपेक्षा जास्त प्राणी प्रभावित झाले आहेत. काजीरंगा राष्ट्रीय उद्यानचे सुमारे 90 टक्के भाग जलमग्न झाला आहे. अधिकारी अनेक उपाय करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...