आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Gets Caught Up In Controversy Again, Social Media Users Accuses Akahay That He Said Bad Words For Lord Shriram In 'Good News'

पुन्हा वादांमध्ये अडकला अक्षय कुमार, 'गुड न्यूज'मध्ये श्रीरामांचा अपमान झाल्याचे म्हणत भडकले सोशल मीडिया यूजर्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 27 डिसेंबरला रिलीज होणार असलेला चित्रपट 'गुड न्यूज' च्या एका डायलॉगमुळे अक्षय कुमार वादांमध्ये अडकला आहे. त्याच्यावर या डायलॉगद्वारे श्रीरामांबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप केला जात आहे. झाले असे की, 18 डिसेंबरला राज मेहताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, अक्षयने एक वादग्रस्त डायलॉग बोलला आहे. यामुळे सोशल मीडिया यूजर्स नाराजी व्यक्त करत आहेत.  

हा आहे वादग्रस्त डायलॉग... 


सीननुसार, पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना एक महिला विचारते, "तू मला हे सांग याचे (बाळाचे) नाव होलाराम का ठेवले ?" उत्तरेत पाहून म्हणतो, "काय झाले की, आजोबाचे नाव राम होते आणि हा होळीच्या दिवशी जन्माला होता त्यामुळे याचे नाव होलाराम ठेवले." यावर अक्षय हसत-हसत म्हणतो, "चांगले झाले की, हा लोहडीच्या दिवशी जन्माला नाही नाहीतर याचे नाव तर..." यावर तिथे असलेले सर्वजन हैराण होतात.

सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स...


सोशल मीडिया यूजर्स या डायलॉगची क्लिप शेअर करून अक्षय कुमारला खरे खोटे ऐकवत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, "घाणेरड्या हास्याच्या आड अक्षय कुमार सरळ सरळ श्री रामांबद्दल अपशब्द उच्चारात आहे."

एका यूजरने लिहिले, "जर बॉलिवूड मध्ये सर्वात बेशरम आणि धूर्त अभिनेतत्यासाठी कोणताच अवॉर्ड नाही. तर निश्चितपणे ते सर्व अक्षय कुमारलाच मिळतील. अक्षयने श्रीरामांचा अपमान केला आहे."

यूजर इथेच थांबला नाही तर त्याने आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले, "एक व्यक्ती, जो विदेशातून येतो, श्री रामाची चेष्टा करतो आणि काही भारतीय अजूनही त्याचे समर्थन करत आहेत, आपला आदर्श बनवत आहेत. एक व्यभिचारी नेहमी व्यभिचारीच राहतो. तो कधीच कुणाचा सन्मान करू शकत नाही. तो इथे केवळ पैसे कमावण्यासाठी आला आहे. धिक्कार आहे."

एका यूजरची कमेंट आहे, "प्रिय अक्षय कुमार तू कॅनेडियन आहेस आणि याच्यावर आमची काहीही हरकत नाही. पण भारतीय धर्म आणि हिंदू देवतांचा अपमान करण्याची हिंमत कशी झाली. आम्ही भारतीय हे सर्व सहन करणार नाही."

आणखी एका यूजरने लिहिले, "श्रीरामांचा भक्त असल्याच्या नात्याने असे वक्तव्य सहन करणार नाही. अक्षय कुमारचे अनेक फॅन या चित्रपटाने प्रभावित होतील, ज्यामध्ये श्रीरामांबद्दल अपशब्द उच्चारले गेले आहेत."