आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay Kumar Has Highest Brand Value In Bollywood, Deepika Padukone Left Behind By One Number

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त, दीपिका पदुकोण एका क्रमांकाने मागे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागच्या वर्षात अक्षय कुमारच्या ब्रँड व्हाल्यूमध्ये 55.3 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी ग्लोबल एडवायझरी फर्म, डफ अँड फेल्प्सने जारी केलेल्या लिस्टमध्ये अक्षय कुमारचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 104 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 744 कोटी रुपये आहे, जी बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त आहे. मात्र पूर्ण लिस्टमध्ये टॉपवर क्रिकेटर विराट कोहली आहे. ज्याची ब्रँड व्हॅल्यू 237 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 1691 कोटी रुपये आहे.  

दीपिका पदुकोण आता आहे तीसऱ्या क्रमांकावर  

मागच्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेली दीपिका पदुकोण यावेळी एक क्रमांकाने मागे पडली आहे. तिचा पती रणवीर सिंह एका क्रमांकाने पुढे येऊन चौथ्यावरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोघांची ब्रँड व्हॅल्यू (वेगवेगळी) 93.5 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 665 कोटी रुपये आहे. दीपिकाने सीएए आणि एनआरसीचा विरोध करत असलेल्या जेएनयू स्टुडंट्ससोबत उभे राहून वादाला आमंत्रण दिले होते, त्यानंतर तिची मार्केट व्हॅल्यू कमी होण्याच्या बातम्या आल्या होत्या.  

अमिताभ - आमिर यांचीही ब्रँड व्हॅल्यू झाली कमी... 

टॉप 20 च्या लिस्टमध्ये 16 बॉलिवूड सेलिब्रिटी आणि 4 क्रिकेटर्स सामील आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान मागच्यावर्षी अनुक्रमे 5 व्या आणि 6 व्या ठिकाणी होते. तर अमिताभ एका क्रमांकाने मागे पडून 8 व्या क्रमांकावर आले आहेत, तर आमिर खान 11 नंबरवरून सरळ 16 व्या क्रमांकावर गेला आहे. 

भारताचे टॉप-20 ब्रँड व्हॅल्यू असलेले स्टार... रँक सेलिब्रिटी 2019 मध्ये व्हॅल्यू (कोटी रु. मध्ये)
1विराट कोहली1691
2अक्षय कुमार744
3दीपिका पदुकोण665
4रणवीर सिंह665
5शाहरुख खान470
6सलमान खान397
7आलिया भट्ट326
8अमिताभ बच्चन300
9महेंद्र सिंह धोनी293
10आयुष्मान खुराना287
11ऋतिक रोशन277
12वरुण धवन251
13प्रियांका चोप्रा 230
14रनबीर कपूर193
15सचिन तेंडुलकर 179
16आमिर खान178
17टायगर श्रॉफ 172
18अनुष्का शर्मा170
19करिना कपूर169
20रोहित शर्मा164