आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड अटॅक सर्वाइवर लक्ष्मीजवळ एकवर्षांपासून नाही जॉब, अक्षयने दिले 5 लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अॅसिड अटॅक सर्वाइवर आणि अॅक्टिविस्ट लक्ष्मी अग्रवालच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे आला आहे. लक्ष्मीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला एक वर्षांपासून जॉब नाही. यासोबतच तिला आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागतोय. अक्षयला लक्ष्मीविषयी माहिती मिळताच त्याने तात्काळ तिच्या बँक अकाउंटमध्ये पाच लाख रुपये ट्रान्सफर केले. लक्ष्मी दिल्लीमध्ये आपल्या तीनवर्षांच्या मुलीसोबत राहते. काही वर्षांपुर्वी ती आपला लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितपासून वेगळी झाली होती. 

 

अक्षयने जाहिर केला मदत करण्याचा हेतू 
लक्ष्मीला मदत केल्याविषयी अक्षय म्हणाला की, मी खुप छोटी मदत केली आहे. यामागे माझा हेतू आहे की, लक्ष्मी जॉब सर्च करु शकेल आणि आपल्या मुलीचे संगोपन टेंशन न घेता करु शकेल. मला लोकांना हेच सांगायचे आहे की, व्यक्तीला जीवन जगण्यासाठी बेसिक गोष्टींची गरज असते, तेव्हा मेडल, अवॉर्ड्रस किंवा सर्टिफिकेट कामी येत नाही. अशा वेळी आपण त्यांना मदत करुन सपोर्ट करायला हवा. 

 

लक्ष्मी म्हणाली - 
मी खुप आभारी आहे, माझ्या भावना मी व्यक्त करु शकत नाहीये. माझी मुलाखत समोर आल्याच्या काही तासातच मला 200 पेक्षा जास्त कॉल आले. यासोतबच सोशल मीडियावरही लोकांनी मदतीसाठी हात पुढे केला. फक्त अक्षय कुमारच नाही, मला एका व्यक्तीने 10,000 ची मदत केली. यासोबतच काश्मीरमधून एका व्यक्तीने 15,000 आणि एका पत्रकाराने 16,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. यासोबतच मला जॉबच्या अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...