आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्जच्या यादीत अक्षयकुमार सर्वाधिक कमाई करणारा टॉप 10 अभिनेत्यांत एकमेव भारतीय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क - 'मिशन मंगल'च्या १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याबरोबरच अक्षयकुमार याच्या नावावर आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे. जगभरात तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांत फोर्ब्जच्या यादीत ४६७ कोटी रुपयाच्या उत्पन्नासह त्याने चौथे स्थान मिळवले आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत हॉलिवूडमधील निर्माता व 'बेवॉच' अभिनेता ड्वेन जॉन्सन alt147द रॉकalt148 ६४२ कोटी रुपयाची कमाई करून टॉपवर आहे. अक्षयनंतर जॅकी चॅन, अॅडम सँडलर, क्रिस इवॉन्स, पॉल रुड व विल स्मिथ यांचा नंबर लागतो. एका एपिसोडसाठी सुमारे ५ कोटी रुपये दिले जातात. त्यानंतर अन्य रॉयल्टीजपासूनही त्याला खूप कमाई होते. ड्ेवन याने याआधी फोर्ब्जमध्ये स्थान मिळवले आहे. 


यादीत जॅकी चॅन
, अॅडम सँडलर, क्रिस इवॉन्स, विल स्मिथ 
रँक   अभिनेता    कमाई 
1  ड्वेन जॉनसन   642 
2  क्रिस हेम्सवर्थ   549 
3  रॉबर्ट डाउनी     474 
4  अक्षय कुमार    467 
5  जॅकी चॅन       416 
6 ब्रॅडली कूपर 409 
कमाई कोटी रुपयात 

बातम्या आणखी आहेत...